जळगावात महिलेचा विनयभंग ; दोघांवर गुन्हा

0

जळगाव , लोकशाही नेटवर्क
दोन जणांनी ३५ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी जळगाव शहरातील महिला दक्षता समिती कार्यालयाच्या बाहेर घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ३५ वर्षीय महिला  २ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास  तिच्या बहिणीसोबात पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता समितीमध्ये चौकशीची तारीखसाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्याठिकाणी चेतन भास्कर चौधरी (वय-२८) आणि भास्कर रामा चौधरी (वय-५५) दोघे रा. आसोदा ता.जि.जळगाव यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे कपडे फाडले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.तक्रारीवरून दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पल्लवी मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.