गीतांजली एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल चोरला

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क
जनरल कोचमध्ये चढताना प्रवाशाचा 19 हजार 400 रुपये किंमतीचा अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबवल्याचा प्रकार गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोटन गुलाब पिंजारी (46, भिलाली, ता.पारोळा) हे प्रवास करताना गीतांजली एक्प्रेसमध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांचा महागडा मोबाईल लंपास केल्याची घटना 15 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात प्रवाशाच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक नरेंद्र चौधरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.