Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कोरोनावरील स्पुटनिक लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाचा खून…
    गुन्हे वार्ता

    कोरोनावरील स्पुटनिक लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाचा खून…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची यावेळी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    याबाबत रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते त्यांच्या मॉस्को येथील घरात आराम करत असताना संशयीत आरोपी तिथे आला. यावेळी काही घरगुती कारणांवरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा आवळून हत्या केली.

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २०२१ मध्ये त्यांचा सत्कारही केला होता. करोनावरील लस तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

    याप्रकरणी मॉस्को पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. २९ वर्षीय संशयीत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने हत्येची कबुली दिली असल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वी सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती निवदेनाद्वारे देण्यात आली आहे.

    #international Covid covid 19 Russia Sputnik VC
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान

    July 17, 2026

    तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश

    July 17, 2026

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif