Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा
    गुन्हे वार्ता

    ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
    खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्यासह पाच ते सहा जणांनी रेमंड कंपनी परिसरात औद्योगिक न्यायालयाचे आदेश असतानाही गर्दी जमवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रेमंड कंपनीमधील काही कामगारांनी वेतनवाढ मान्य नसल्यामुळे संप पुकारला आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज २४ तारखेपासून बंद असून कंपनीच्या ५० मीटरच्या आवारात कुणीही गर्दी करू नये असे औद्योगिक न्यायालयाचे आदेश असतानाही खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्यासह पाच ते सहा जणांनी गर्दी जमवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे प्रभारी मुख्य प्रबंधक प्रफुल्ल दत्तात्रय गोडसे यांनी फिर्याद दिली आहे.

    फिर्यादीनुसार, ललित कोल्हे व पाच ते सहा जण मंगळवारी दुपारी १ वाजता रेमंड कंपनीच्या ५० मीटरच्या आत येवून कामबंद आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत होते, यासंदर्भात गैरकायद्याची सिक्युरिटी इन्चार्ज गिरधारी कुर्वे यांनी गोडसे यांना कळविले. त्यानंतर कुर्वे यांनी कोल्हे यांना समजावून सांगून कंपनीच्या ५० मीटर बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर आपण कुठलेही आंदोलन करत नसल्याचे सांगत कोल्हे व इतर लोक ५० मीटरच्या आतच थांबून राहिले. हा प्रकार कुर्वे यांनी गोडसे यांना कळविला. त्यानंतर रात्री गोडसे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून मंडळी जमविल्याप्रकरणी कोल्हेंसह पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #crime jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif