सोने उतरले चांदी वधारली ! ; जाणून घ्या आजचे दर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सोन्याचांदीच्या गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल वाढला असून सोने चांदीच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूक आणि लग्न सराईमुळे खरेदीला ग्राहक प्राधान्य देऊ लागले आहे. सध्या सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत असून आज १ मार्च रोजी सोन्याचे दर जळगावच्या सुवर्ण बाजारात प्रति १० ग्रामला दुपारी १२ वाजेपर्यंत ५५ हजार ८०० रुप्ये होते. जे कालच्या तुलनेत ६० रुपयांनी कमी झाले.

तसेच चांदीच्या भावात मंगळवारी चांगलीच घसरण पाहायला मिळाली होती. आज दुपारपर्यंत चांदी प्रतिकिलो ६४ हजार ७९० रुपये इतके भाव मिळाला असून आज २२० रुपयांनी चांदीच्या भावात वाढ झाली. दरम्यान सोन्या चांदीच्या होणाऱ्या घसरणीचा गुंतवणुकीसाठी फायदा होईल असे या क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.