Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक; माथेफिरू प्रियकराने प्रेयसीला चाकूनं १७ वेळा भोसकलं…
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक; माथेफिरू प्रियकराने प्रेयसीला चाकूनं १७ वेळा भोसकलं…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 2, 2023Updated:March 2, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    बंगळुरूत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. प्रियकरानं आपल्या प्रेयसीची भररस्त्यात चाकूनं भोसकून हत्या केली. प्रियकराच्या चाकू हल्ल्यात जीव गमावलेल्या लिला पविथ्रानं आरोपी दिनकरची तक्रार दिशाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कर्नाटकात दिशा अधिकारी कार्यरत आहेत.

    दिनकर त्रास देत असल्याची तक्रार लिलानं दिशाच्या अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्यांनी पीडिता आणि आरोपी यांच्यात तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला. दिनकरनं लिलाला चाकूनं १७ वेळा भोसकलं, अशी माहिती ऑटोप्सी (शवविच्छेदन) अहवालातून समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. दिनकरनं लिलाला चाकूनं भोसकलं. ती रस्त्यात कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दिनकर तिच्या निष्प्राण देहाजवळ बसून राहिला.

    लिला आणि दिनकरचे ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करायचं ठरवलं. लिलानं कुटुंबीयांना दिनकरबद्दल सांगितलं. दिनकर वेगळ्या जातीचा असल्यानं तिच्या कुटुंबानं नकार दर्शवला. त्यामुळे लिलानं दिनकरशी बोलणं बंद केलं. ‘लिलावर तिच्या आईचा खूप प्रभाव होता. तिच्यामुळेच लिलानं माझ्याशी बोलणं टाकलं’, असं दिनकरनं पोलिसांना सांगितलं.

    दिनकरला लिलाशी बोलायचं होतं. लिला ऐकली तर ठीक, अन्यथा तिला तिथेच संपवायचं या हेतूनं दिनकर चाकू घेऊन लिलाला भेटायला गेला. लिलानं लग्नाला नकार दिल्यास तिचा खून करायचा ही बाब त्यानं मनाशी पक्की केली होती. ऑफिसमधून निघालेल्या लिलाला दिनकरनं गाठलं. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकली नाही. तेव्हा दिनकरनं लिलाला भररस्त्यात १७ वेळा चाकूनं भोसकलं. जे बी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दिनकरला अटक केली. लिलाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

    २५ वर्षांची लिला ओमेगा हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून कार्यकत होती. २०१७ पासून तिचे दिनकरशी प्रेमसंबंध होते. लिला कॉलेजमध्ये दिनकरला सिनीयर होती. हे दोघेही मूळचे आंध्रप्रदेशचे आहेत. २८ वर्षांच्या दिनकर बनालानं लिलाची तिच्या ऑफिसबाहेर हत्या केली. लिलानं दिनकरचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. व्हॉट्स अपवरही दिनकरला ब्लॉक केलं होतं.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #murder #police Bangalore Love Affair
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू

    November 17, 2026

    लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ

    November 17, 2026

    अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराचा कट

    November 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif