जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधून बॅटरी, डिझेल चोरी !

0

स्कार्पियो वाहनासह मुद्देमाल हस्तगत ; भडगाव पोलिसांची कारवाई

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील निंभोरा शिवारात जियो कंपनीच्या टॉवर मधून बॅटरी, व डिझेल चोरी करून फरार होण्याच्या मार्गावर असलेले चोरट्यांच्या भडगाव पोलिस स्टेशन चे रात्र गस्तीवर असलेले पोलिसांनी पाठलाग करताच अज्ञात चोर चारचाकी वाहन व मुद्देमाल सोडून फरार झाल्याची घटना घडली आहे या बाबत भडगाव पोलिस स्टशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी- सतिष दगा पवार, वय २८ वर्षे, धंदा जिओ टेक्निशियन, रा. स्वामी समर्थ मंदिरासमोर, बाळद रोड, भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भडगांव ते चाळीसगांव रोडवरिल निंभोरा ता. भडगांव शिवारातील शेतगट नं. २१९ / २ / A मध्ये असलेले जिओ कंपनीचे टॉवर वरुन वस्तुंना हाताळणी करत असताना झालेला अलार्म वाजल्याने याची माहिती तात्काळ दिल्याने पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या आदेशाने गस्तीवर असलेले पो. कॉ. प्रकाश गवळी व पोलीस स्टेशनच्या शासकिय वाहनावरिल वाहन चालक पोकॉ. संभाजी पाटील आदींचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी गस्ती पथकाला पोलीसांना मेहंदी रंगाची स्कार्पियो गाडी क्र. MH-०५ G – २५६८ हि रस्त्यावर उभी असलेली दिसली. यावेळी वाहनात असलेल्या संशयित आरोपीतांना पोलीस आल्याची चाहुल लागल्यामुळे त्यांनी वाहन घेऊन पळ काढला.

त्यांचे ताब्यातील नमुद स्कार्पियोने तेथुन पळुन जाऊ लागल्याने पथकाने लागलीच त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग सुरु केला. मात्र चोरटयांनी वाहन मळगांव गावाजवळ तीन अनोळखी चोरटयांनी अंधाराचा फायदा घेवुन पळ काढला. वाहनांची तपासणी केली असता असता वाहनात ईक्साईड एक्सप्रेस कंपनीच्या ४ बॅटऱ्या, प्रो ऑन कंपनीची लाल रंगाची बॅटरी, डिझेल ओढण्यासाठी बॅटरीवर चालणारे मशिन नळीसह, एक सेल बॅटरी,९ मोठ्या प्लॅस्टिक कँन पैकी एक डिझेलने भरलेली, ०२ काळ्या रंगाच्या सँक (बँग) त्यामध्ये एक मोठा स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी टामी, एक स्क्रू ड्रायव्हर, करवत पान (मोठे), करवत पान (लहान), पकड, वायर कटर, लोखंडी हत्यार, लहान बँटरी, ०७)SBI बँकेचे ATM त्यावर ABHAY KALE त्यावर ६५२२९४०९३९२५३९१३ असा नंबर असलेले, एक छोटी डायरी अशा वस्तु मिळुन आल्या.

सतिष दगा पवार, वय २८ वर्षे, धंदा जिओ टेक्निशियन, रा. स्वामी समर्थ मंदिरासमोर, बाळद रोड, भडगांव यांनी नमुद प्रकरणी यातील तीन अनोळखी आरोपीतांविरुद्द फिर्याद दिल्याने भडगांव पोलीस स्टेशनला गुरन ६३ / २०२३ भादवि कलम ३७९,४२७ प्रमाणे दिनांक ०६/०३/२०२३ रोजी ०१ ०० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ, चाळीसगांव . रमेश चोपडे, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग, चाळीसगांव अभयसिंह देशमुख, पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सफौ, कैलास फकिरा गिते करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.