शिक्षक विलास निकम यांना नॅशनल टिचर्स इनोव्हेशन अवार्ड

0

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तरावरील शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा-२०२२ मध्ये विलास अरुण निकम उपशिक्षक जि प मराठी मुलींची शाळा लोहारा ता पाचोरा यांनी सहभाग घेतला होता. सरांनी कोरोना काळात मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून “कोरोना काळात व्हाट्सअँप मोबाईलद्वारे स्मार्ट शिक्षण” हा उपक्रम राबवून मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले होते.

तसेच मुलीच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध ऑनलाइन स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन करून मुलींना सहभागी करून घेतले होते.विविध ऑनलाइन स्पर्धेत मुलींना तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर बक्षिसे मिळवले आहेत.या उपक्रमात पालकांचे सहकार्य मिळाले.

मुलींच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. म्हणून त्यांचा या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर इनोव्हेशन नवोपक्रम म्हणून निवड झाली सर फाउंडेशन कडून आयोजित 4 व ५ मार्चच्या राष्ट्रीय शैक्षणिक इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये निकम सरांना नॅशनल इनोव्हेशन टिचरचा अवार्ड मा श्री डॉ अरविंद नातू (जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक)मा श्री डॉ ह. ना. जगताप (जेष्ठ शिक्षणतज्ञ)डॉ दिपक माळी (प्रसासन अधिकारी MSCERT), प्रदीप मोरे (उपसंचालक पुणे) श्रींमती डॉ किरण धांडे (यशदा पुणे),दत्तात्रय वारे (ख्यातनाम प्रयोगशील शिक्षक) व सर फाउंडेशन चे राज्य समन्वयक सिद्धाराम मासाळे,बाळासाहेब वाघ,महिलाध्यक्ष हेमा शिंदे, आयटी विभाग प्रमुख,रविकिरण चव्हाण यांच्या हस्ते त्यांना हा अवार्ड देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.