गिरणानदी पात्रातील होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करून कारवाई करा

0

वडजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे तहसीलदारांना निवेदन

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील वाक-वडजी येथील गिरणा नदी पात्रातील वडजी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून सर्रास जे.सि.बी. द्वारे नदीतून वाळूचे उत्खनन सुरू असून या ठिकाणाहून अनेक डंपर वाळू दररोज उपसली जाऊन वाहतूक केली जाते. या बाबत वडजी ग्राम पंचायत ने वेळोवेळी लेखी निवेदन देऊन सुद्धा काहीच कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून अवैध वाळू उत्खनन हे कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी वडजी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी तहसिलदार मुकेश हिवाळे यांना लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वडजी गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक बाबत सदर नदीपात्रा जवळील सार्वजनिक पांनी पुरवठा विहीर आहे. वेळोवेळी अवैध वाळू उत्खनन करू नये असे तहसील कार्यालय येथे लेखी निवेदन दिले आहे. परंतु या बाबत आपण अद्याप पर्यंत कुठलीही ठोस कारवाई केली नाही. गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू उत्खनन असेच सुरू राहिले तर भीषण पाणीटंचाई निर्माण होईल. तहसील कार्यालयाने कुठलीही कारवाई केली नाही म्हणून आम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणी मोठे खड्डे. तसेच काटेरी झुडपे लावले होते. ते सुद्धा वाळू माफिया यांनी खड्डे बुजून काटेरी झुडपे फेकून अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. दि.26 रोजी वाक गावातील अवैध वाळू वाहतूक करणारे तीन वाळू माफिया (त्यांचे नाव निवेदनात आहेत. व तहसिलदार यांना माहिती आहे.) यांनी ते खड्डे बुजले व काटेरी झुडुपे फेकून जे.सि.बी. द्वारे उत्खनन सुरू आहे. तसेच रात्री बेरात्री वॉटर सप्लाय विहिरी वर ग्रामस्थ यांना पाणी सोडण्यासाठी जावे लागते. वाळू माफिया कोणालाही जीव घेण्याइतपत स्तराला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. असे झाल्यास सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन राहील.शासनाने ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी लाखो रुपये खर्च करून वॉटर सप्लाय विहिरी तयार केली आहे. तरी या ठिकाणाहून अवैध वाळू उत्खनन त्वरित बंद करा. तसेच अवैध वाळू वाहतूकदारांवर काय कारवाई झाली तसा लेखी खुलासा द्यावा. अन्यथा जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला सर्व ग्रामस्थ जातील असा ईशारा लेखी निवेदना्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर सरपंच – मनीषा विजय गायकवाड, सदस्य- इंदिराबाई पाटील, समाधान पाटील, स्वदेश पाटील, दिनेश परदेशी, सुरेखा पाटील, पुनम सोनवणे, कविता पाटील, उज्ज्वला पाटील, मेहमूद पटेल, संभाजी भिल्ल, किशोर मोरे, पोलिस पाटील – अंबु मोरे, विजय पाटील, राजेंद्र पाटील, भाईदास पाटील राजेंद्र पाटील आदींच्या साह्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.