मुंबई महापालिकेत परिचारिका पदाच्या ६५२ जागांसाठी भरती

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत परिचारिका पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 652 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 08 मार्च 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

भरले जाणारे पद – परिचारिका

पद संख्या – 652 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 08 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (BMC Recruitment 2023)

वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011

मिळणारे वेतन –

परिचारिका Rs. 35,400 – 1,12,400/- दरमहा

असा करा अर्ज –

उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. (BMC Recruitment 2023)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह दि. 28/02/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.