सलमानच्या आगामी चित्रपटातलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सलमान खान लवकरच त्याचा आगामी चित्रपट “किसी का भाई किस की जान” मध्ये झळकणार आहे. त्याच प्रमाणे सर्वच चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता होती. सलमान खानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बाॅस फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमान खान याने किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी शहनाजला दिली. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यापासून शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटामध्ये सलमान खान याच्यासोबत काम करण्याची संधी शहनाज गिल हिला मिळाली आहे.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील पहिले गाणे नय्यो लगदा हे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. विशेष म्हणजे या गाण्याला चाहत्यांनी खूप जास्त प्रेमही दिले. आता याच चित्रपटातील दुसरे गाणेही चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. गाण्याच्या रिलीज डेटबद्दल स्वत: सलमान खान याने माहिती शेअर केली आहे. किसी का भाई किसी की जान चित्रपटामधील दुसरे गाणे बिल्ली बिल्ली (Billi Billi Song) हे 2 मार्चला रिलीज होणार आहे. याबाबतची खास पोस्ट सलमान खान याने शेअर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.