Browsing Category

महाराष्ट्र

वन खात्याची धडक कारवाई : अवैध डिंकासह मोटारसायकल जप्त

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क बोरखेडा-मारूळ बारी रस्त्यावर वन खात्याच्या पथकाने धडक कारवाई करत अवैध डिंकासह मोटारसायकल जप्त केली आहे. तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बोरखेडा मारूळ बारी रस्त्यावर पुर्व वन विभागाने सापळा…

साकळी येथील जि.प.मराठी मुलींच्या शाळेत अज्ञातांकडून चोरी

शालेय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; अपूर्ण बांधकामामुळे चोरीच्या घटना मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत वर्गाचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दि.६…

फिल्मी स्टाईलने चालत्या मालगाडीवर चढून कोळसा चोरीच्या प्रकरणात वाढ

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात दररोज शेकडो टन कोळशाची मागणी असल्याने गेली कित्तेक वर्षापासुन दररोज वरणगाव, फुलगाव मार्गे रेल्वेने कोळसा आणला जात आहे. मात्र फुलगावमधील काही चोरट्यांनी रेल्वेने येणारा कोळसा…

जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधून बॅटरी, डिझेल चोरी !

स्कार्पियो वाहनासह मुद्देमाल हस्तगत ; भडगाव पोलिसांची कारवाई भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील निंभोरा शिवारात जियो कंपनीच्या टॉवर मधून बॅटरी, व डिझेल चोरी करून फरार होण्याच्या मार्गावर असलेले चोरट्यांच्या भडगाव पोलिस स्टेशन…

शिक्षक विलास निकम यांना नॅशनल टिचर्स इनोव्हेशन अवार्ड

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क सर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तरावरील शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा-२०२२ मध्ये विलास अरुण निकम उपशिक्षक जि प मराठी मुलींची शाळा लोहारा ता पाचोरा यांनी सहभाग घेतला होता. सरांनी कोरोना काळात मुलींचे…

जळगाव शहरासह जिल्ह्यात धूलिवंदन जल्लोषात साजरा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरासह जिल्ह्यात सप्त रंगाची मुक्तपणे उधळण करून मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली गेली. नेहरू चौक, काव्य रत्नावली चौक येथे मोठ्या प्रमाणावर तरुणाई जमून गाण्यांच्या तालावर थिरकून मनमुराद आनंद लुटला .…

अनोळखी महिला पुरुषाने केले लहान मुलाचे अपहरण ; घटना सीसीटीव्हीत कैद

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा मंदिरातून अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना समोर आली असून हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आयुष नावाच्या मुलाचा पोलिस कसून तपास करीत आहेत.…

श्री मंगळ ग्रह मंदिरात पर्यावरण पूरक होळी पूजन

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक पद्धतीने पर्यावरण पूरक होली पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम पाटील ( पान खिडकी ) पूजेचे मानकरी होते. होली पूजनापूर्वी…

हिंदुत्व व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेला धर्म वेडा तरुण प्रकाश गोसावी

मुक्ताईनगर , , लोकशाही न्यूज नेटवर्क आदिशक्ति संत मुक्ताई साहेबांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत टाळ, मृदुंगाच्या व नाम संकीर्तन गजराने अवघी मुक्ताईनगरी न्हाऊन निघत असते. त्यातच यात भर घातली आहे काही धर्म वेड्या तरुणांनी ज्यामुळे…

राष्ट्रवादी रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुखपदी सुशिल पाटील यांची नियुक्ती

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील सुशिल प्रेमचंद पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा मतदारसंघच्या क्षेत्रप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे व…

विवेकानंद विद्यालयात दुर्गुणांची होळी साजरी करून समाजप्रबोधन

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील विवेकानंद विद्यालयात होळी या सणानिमित्त माध्यमिक विभागाच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी व काही उपक्रशील शिक्षकांनी शाळा व सभोवतालच्या आवार परिसरातील मोठ्या प्रमाणात पसरलेला प्लास्टिक घनकचरा…

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बारावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून बारावीची परीक्षा  देणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अहमदनगरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.राज्यात सध्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेची पूर्ण तयारी करुन…

अनेकांच्या सुखदुःखाचे स्टेटस ठेवणारा अवलिया धनराज चौधरी

धानोरा ता. चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजच्या आधुनिक युगात या जगात कोणी कोणाचे नाही असं जरी आपण म्हणत असलो तरी याला अपवाद आहेत धानोरा येथील धनराज चौधरी ( मुखी महाराज ) महाराज गेल्या अनेक वर्षापासून गावासह परिसरातील एकच नव्हे तर बाहेर…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात 3 जण जागीच ठार

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क ट्रक आणि कारच्या या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती,…

पहूर येथे राज्यसरकारच्या विरोधात खोक्याची होळी !

पहूर. ता.जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क होळीच्या मुहूर्तावर राज्य सरकार च्या विरोधात खोक्याची होळी जाळून युती सरकारचा निषेध करण्यात आला.पहूर शहर महाविकास आघडी च्या वतीने राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली .…

माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह इतरांना दिलासा

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांच्या अपात्रतेला त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर…

विहिरीत पाय घसरून पडल्याने मजूराचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील अट्रावल गावात विहीरीच्या कामासाठी गेलेल्या एका मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,…

सागर शिंपी यांची मनसे विधी शहर सचिव पदी निवड…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, ॲड. किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे दि. ०३-०३-२०२३ रोजी सागर गणेश शिंपी यांची जळगाव शहर…

धक्कादायक; क्रूर मातेने घेतला तीन वर्षाच्या मुलीचा जीव…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: आई आणि बाळाचे नातं कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. आईची माया काय असते आणि ती तिच्या लेकरांसाठी कुठल्या हद्दीपर्यंत पोहोचेल याची सीमा नसते. मात्र एका आई ने आपल्या व तिच्या प्रियकराच्या आड…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘अंतराग्नी’ स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क विद्यार्थ्यांनी स्वत:मधील क्षमता‎ ओळखून ध्येय ठरवावे. मन व शरीर सुदृढ‎ ठेवून सांस्कृतिक, बौँध्दीक व सर्वांगीण‎ विकास साधता येतो. विद्यार्थ्यानी रोज‎ योगा अभ्यासाचा व धावण्याचा सराव‎ नियमित करावा तसेच विविध…

जम्मू-काश्मीरला टरबूज विक्री ; पिळोदा येथील शेतकरी झाला ‘ लखपती ‘!

गोकुळ कोळी , लोकशाही न्यूज नेटवर्क मनवेल ता.यावल-शेतीत विविध असे प्रयोग करून शेती व्यवसाय कसा व किती फायद्याचा आहे याचा प्रत्यय साकळी येथून जवळच असलेल्या पिळोदा येथील शेतकरी अजय गुर्जर- पाटील यांनी आणून दिलेला आहे. आपल्या तीन एकर शेतीत…

गोराडखेडा येथील प्राथमिक शाळेतून दोन एलईडी टीव्ही संच लांबविले

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील जळगाव ते पाचोरा राज्य महामार्गालगत असलेल्या गोराडखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्यांनी दगडाने तीन शाळा खोल्यांचे दरवाजे तोडून तीन एल. ई. डी. टी. व्ही. संचची चोरी…

जागतिक महिला दिनानिमीत्‍त भव्य रॅलीचे आयोजन

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क वैदयकिय शिक्षण विभागाच्या निर्देशनानुसार व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापिठाच्या रोप्य महोत्सव वर्षानिमीत्‍त जागतिक महिला दिनानिमीत्‍त दि ८ मार्च रोजी स्तन कँन्सर जनजागृती व उपचारावर भव्य…

अहिराणी गाण्यांवर थिरकली तरुणाई…

मू. जे. महाविद्यालाच्या ‘चैतन्य २०२३ ’ स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप जळगाव ;- महाविद्यालयीन जीवनात आपण कोणते करियर निवडावे या संभ्रमात आपण असतो . तुमच्या भविष्याला आकार देण्याचे व्यासपीठ महाविद्यालय आहे, याठिकाणी असलेल्या सुविधांचा…

तू सनी देओल सारखा दिसत आहे, अहमदनगरच्या माणसासोबत घडली मजेदार गोष्ट

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. आणि त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यात गदर हा त्याच्या सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेल्या…

अमिताभ बच्चन यांचा चित्रीकरणादरम्यान अपघात

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "हैद्राबादमध्ये 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचा…

बनावटी रंगांपासून घ्या काळजी ; नैसर्गिक रंगांची उधळण करून साजरे करा धूलिवंदन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क होळी खेळताना थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर अडचण निर्माण होऊ शकते. होळीचे रंग हे आपल्या त्वचेला, डोळ्यांना, केसांनाही हानी पोहोचवू शकतात. अशा स्थितीत होळीच्या रंगोत्सवानिमित्त काही काळजी घेणे आवश्यक…

मांडळ येथील तरुणाच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तरूणाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून करण्याच्या प्रयत्नातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी या तरूणाचा १७ जानेवारी रोजी त्यांच्या शिवारातील शेतात निर्घृण खून झाला…

गुटखा तस्करी बाबत आरोप प्रत्यारोप कशासाठी?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. कुटख्याच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा केला आहे. तथापि शेजारच्या मध्य प्रदेशात गुटखाबंदी नसल्याने मध्य प्रदेशातून कोट्यावधी रुपयाची महाराष्ट्रात तस्करी होते.…

गीतांजली एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल चोरला

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क जनरल कोचमध्ये चढताना प्रवाशाचा 19 हजार 400 रुपये किंमतीचा अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबवल्याचा प्रकार गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटन गुलाब पिंजारी (46,…

प्रेरणा एक्स्प्रेसमधून चोरट्याने महिलेची पर्स लांबविली

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क प्रवासी झोपल्याची संधी साधून प्रेरणा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाची पर्स चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.…

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दोन महिलांचा विनयभंग ; गुन्हा दाखल

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क उभ्या असलेल्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना भुसावळ रेल्वे स्थानकावर घडली असून जळगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगावातील रहिवासी…

तरोडा येथील संजना हिवरकर हिने पटकवले सुवर्णपदक

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क 19 वी नॅशनल सिलंबम चॅम्पियनशिप 2022-23 अय्यान केंद्र सीबीएसई स्कूल, राजपलयम, तामिळनाडू येथे 24 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान झाली. या स्पर्धेत ठाणे येथील सेंट लॉरेन्स हायस्कुलची विद्यार्थिनी संजना गजानन…

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सुविधेबद्दल महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी…

मुक्ताईनगर मतदार संघातील रस्त्यांसाठी 17.57 कोटी रु. मंजूर – आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय देण्याबाबत मान्यता मिळालेली असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन,ग्राम विकास…

गावात स्वच्छता व कामकाजात पारदर्शकता महत्वाची- गुलाबराव पाटील

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ग्रामसेवक हे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम करीत असल्याने ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकाची भूमिका…

अरे बापरे .. ! ; २५ लाख रूपयांची केळीची खोडे माथेफिरूंनी कापली !

यावल लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल परिसरातील एका शेतकर्‍याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किंमत असलेली केळीची खोडे माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यात मध्यंतरी अनेक शिवारांमध्ये केळी…

शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार- अब्दुल सत्तार

अमरावती , लोकशाही न्यूज नेटवर्क कांद्याला अत्यल्प भाव मिळत असून, शेतकऱ्यांची भावना मला कळू शकते कधी कधी मंदी येते, पण कधी कधी चांगला दर मिळतो . भविष्यात ज्या-ज्या ठिकाणी मागणी येईल तिथे कांदा खरेदी होईल. नाफेडद्वारे आतापर्यंत 28 हजार…

मनवेल विकासोच्या १३ जागा, १८ अर्ज दाखल ; तीन जागा बिनविरोध

मनवेल ता. यावल : लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून ३ जागा बिनविरोध निवडुन आल्या आहेत. २० मार्च पर्यत माघारी पर्यंत सर्वपक्षीयांच्या…

श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानचे पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चांगदेव येथील श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानासह पर्यटनस्थळाचे भाग्य उजळले असून खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने पुरातत्त्व विभागाचे पथकाकडून…

महावितरणच्या जनमित्रांचा गौरव लाईनमन दिवस उत्साहात साजरा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणतर्फे लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच…

चोरी केलेल्या बकर्‍यांची विक्री करणाऱ्या दोन महिला ताब्यात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क चोरी केलेल्या बकर्‍यांची विक्री करणार्‍यासाठी एमआयडीसीतील गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी ४ मार्च रोजी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ६…

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान जळगाव…

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव नॅशनल सेफ्टी कौन्सीलच्या ‘हमारा लक्ष शून्य हानी’ या थीमच्या आधारे जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. दि.४ ते १० मार्च दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा…

‘सामी सामी’….’वाजले की बारा’…..’झुमका वाली पोर’ वर…

चैतन्य 2023 स्नेहसंमेलनात दंगा .. मस्ती .. धूम... जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  सामी... सामी... वाजले की बारा... एका साकी एका साकी... झुमका वाली पोर स्नेहसंमेलनात धमाकेदार सिनेगीतावर विद्यार्थ्यांनी दंगा .. मस्ती .. धूम...धमाल केली.…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे “होलिकोत्सव” साजरा!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. होलिकोत्सवाच्या प्रारंभी प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते शारदा स्तवन व दीपप्रज्वलन करण्यात…

सप्तशृंगीगड दानपेटी प्रकरणी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची दिशा बदलून त्यावर चुना लावत सुरक्षा रक्षकानेच सप्तशृंगीगड येथे भगवती मंदिर परिसरातील दानपेटीतून रोकड काढल्याने त्याच्या विरोधात कळवण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.…

शासनाच्या विविध योजनांचा जळगाव जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास…

विद्यापीठांना अधिसूचना… नाही तर प्रवेश होतील रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचा समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन…

विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार

अधिवेशनातुन परतल्यावर रेल्वे स्थानकावरच घेतली आमदारांची भेट अमळनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर…

६ ते ८ मार्च दरम्यान खान्देशात पावसाचा इशारा

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात अनेक ठिकाणी हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असून खान्देशात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला…

प्रवासात ओळख; बलात्काराचा व्हिडीओ… तरुणीकडून लाटले १६ लाख रुपये…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: बस प्रवासात ओळख झाल्यानंतर पुण्यात पुस्तके खरेदीसाठी आलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस , ‘होलिकोत्सव’ उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि होळीच्या आगमनाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कु.अनया पवार या विद्यार्थिनीने राष्ट्रीय सुरक्षा दिवस व त्याचे महत्व आपल्या प्रस्ताविकेतून…

विराट अनुष्काने घेतले उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन (पहा व्हिडीओ )

उज्जैन , लोकशाही न्यूज नेटवर्क टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी आज पहाटे उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी दोघांनी आरती केली . याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…

विक्रीतून व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी २०० विद्यार्थी उतरले रस्त्यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा आत्मविश्वास प्रबळ होईल. “मंडी” या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, व्यवहाराची माहिती व सखोल व्यावहारिक…

मुक्ताईनगर आक्रोश मोर्चाची शासन दखल घेईल का?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुका विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र…

दर सेकंदाला गौतम अदानी यांची २ कोटींची कमाई

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी हे शुक्रवारी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त नफा मिळवणारे होते.गौतम अदानी यांच्या संपत्तीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. ही वाढ चार…

जिल्ह्यातील दोघांवर २ वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव शहरातील एका टोळीच्या प्रमुखासह टोळीच्या एका सदस्याला जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. याबाबचे आदेश शुक्रवार, ३ मार्च रोजी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिले…

किरीट सोमय्यांच्या कार्यालयात घोटाळा; वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क घोटाळेबाजांच्या मागे लागून त्याला वठणीवर आणणारे किरीट सोमय्याचं (Kirit Somaiya) आता फसले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयात घोटाळा झाला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात तक्रार देण्यात…

लाईनमन : वीज वितरण व्यवस्थेचा कणा

अन्न, वस्त्र,‍ निवाऱ्यासारखीच वीज ही आपल्या आयुष्यातील आज मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येणार नाही, इतके अनन्यसाधारण महत्त्व विजेला आहे. मुंबईचा काही भाग वगळता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील घराघरात…

भर रस्त्यात अडकली महागडी कार, नेटकऱ्यांकडून होतोय संताप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हौसेला मोल नाही, ते काय उगाच म्हणत नाही. पण ह्या हौसेपोटी कधी कधी आपणच संकटात सापडतो. तशीच काही मुंबईतील एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत जॅग्वार सेडान (Jaguar sedan) गाडी गर्दीच्या रस्त्यावरील स्पीड…

इंडियन रेडक्रॉसच्या मेडिकल व्हॅनचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन रेडक्रॉस संघटनेच्या मेडिकल व्हॅनचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आला. इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे कोरोना काळातील जळगावचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेता कॅनडियन…

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन तर्फे अहिंसा रन चे अनावरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगांव जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो लेडीज विंग तर्फे अहिंसा रन रविवार दि. २ एप्रिल २०२३ रोजी ३ / ५ /१० किलोमीटर अंतर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. अहिंसा रन ६५ शहरात एकाच दिवशी एकाच वेळी…

जिल्हा वार्षीक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेसाठी ५५ कोटीं ९१ लक्ष तरतुदीला शासनाची मान्यता !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनांच्या अंतर्गत २०२३-२४ करीता शासनाने कमाल आर्थिक मर्यादा नियतव्यय ४५ कोटी ९१ लक्ष मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आग्रहास्तव आदिवासी विकास…

विरवाडे येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील विरवाडे येथे 2 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाच्या घरी जावून दमदाटी व धक्काबुक्की करून चाकूचे वार करून तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी…

एसटी आणि टेम्पोत जोरदार धडक, एक ठार ३० जखमी…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे.…

महिला पोलीस अधिकारींना निरोप देतांना सहकारी भावूक…(व्हिडीओ)

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाण्याला दोन बाजू असतात चीत किंवा पट, त्याच प्रमाणे माणसाच्याही दोन प्रवृत्ती असतात. एक मावळ आणि एक जहाल. आणि जर पोलीस म्हटलं की, अनेकांना त्यांचा कठोर रुद्रावतारच समोर येतो. मात्र, अहमदनगरमधून…

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; 25 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांचे पथकाने गुरुवार २ मार्च, २०२३ रोजी…

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय – महिला व बाल विकास मंत्री

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास…

जळगाव येथील रेमंड कंपनीसंदर्भात कामगार हिताचा निर्णय घेणार – कामगार मंत्री

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून जळगाव येथील एमआयडीसीमधील रेमंड लिमिटेड कंपनी पुन्हा सुरू झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कामगार हिताचा निर्णय घेतला जाईल, असे…