जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
होळी खेळताना थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर अडचण निर्माण होऊ शकते. होळीचे रंग हे आपल्या त्वचेला, डोळ्यांना, केसांनाही हानी पोहोचवू शकतात. अशा स्थितीत होळीच्या रंगोत्सवानिमित्त काही काळजी घेणे आवश्यक आहे.बनावट रंगांपासून सावध राहून नैसर्गिक पद्धतीने बनलेल्या रंगाने होळी उत्सव साजरे करा.
रासायनिक रंगांचे आरोग्यावर परिणाम
रंगांमध्ये अनेक प्रकारची केमिकल्स आणि हानिकारक रसायने असल्याने डोळ्यांना आणि त्वचेला ॲलर्जी होणे, श्वसनाचा त्रास, त्वचेवर जखमा, केस कोरडे पडणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत फक्त चांगले आणि नैसर्गिक रंग वापरा जेणेकरून होळीच्या या रंगात रंगताना तुम्ही आजारी पडणार नाही.
बनावट रंगापासून रहा सावध
हर्बल रंग किंवा ऑर्गॅनिक रंग अतिशय फिकट असतात. हे फळ आणि फुलांच्या रंगांपासून बनवले जाते. या रंगांमध्ये विशेष ब्राइटनेस नसतो, परंतु काही विक्रेत असे असतात, जे अधिक पैसे कमावण्यासाठी रंगांमध्ये स्वस्त आणि हानिकारक रसायनांचा वापर करतात. त्यात एस्बेस्टोस-सिलिका सारखी घातक रसायने देखील असू शकतात. ज्याचा त्वचेवर व आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत हर्बलच्या नावाखाली बनावट रंग खरेदी करणे टाळावे.
या रंगांचे आहेत नुकसान
लाल रंग- यात पारा-सल्फाइटचे मिश्रण असते. यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. त्याचा त्वचेशी संपर्क टाळा.
हिरवा रंग- त्यात कॉपर सल्फेट आढळते, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते, ज्यामुळे दृष्टी प्रभावित होऊ शकते.
काळा रंग – यामध्ये लेड-ऑक्साईड मिसळले जाते. जर ते तोंडातून पोटात गेले तर मूत्रपिंडात अनेक समस्या उद्भवू शकतात.
निळा रंग- यामध्ये प्यूशिअन ब्लू असतो, त्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे होळी खेळताना काळजी घ्या.
चमकते रंग – यामध्ये ॲल्युमिनियम ब्रोमाइड असते, त्याच्या वापराने त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणून हे रंग वापरू नका.
सिल्व्हर कलर – याच्या वापरानेही त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो. हा रंग सहजासहजी निघत नाही.
सोनेरी रंग- या रंगाच्या वापरानेही त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
असे ओळखा खरे व बनावटी रंग
कोरड्या रंगात किंवा गुलालात काही चमक असेल तर ती काचेची पावडर असू शकते.
रंग विकत घेण्याआधी त्यांचा वास घ्या, जर त्याला वास येत असेल तर याचा अर्थ त्यात एखादे केमिकल किंवा इंजिन ऑईल मिसळले आहे.
रंग त्याच्या ब्राइटनेसवरूनही ओळखता येतो, नैसर्गिक रंगात ब्राइटनेस किंवा खूप चमक अजिबात नसते.
घरच्या घरी बनवा रंग
लाल रंगासाठी पलाश आणि पिवळ्या रंगासाठी तेसू फुलांचा वापर करावा.
बीटरूट बारीक करून पाण्यात भिजवा. खूप छान गुलाबी रंग तयार होईल.
पारिजातकाची फुले सुकवून उकळून केशरी रंग बनवता येतो.
रंग खेळताना या गोष्टी लक्षात ठेवा
होळी खेळण्यापूर्वी केसांसह संपूर्ण त्वचेला मोहरीचे तेल लावा.
होळी खेळल्यानंतर अंघोळ केल्यावर नारळ किंवा बदामाचे तेल अंगभर लावावे.
रंग किंवा गुलाल डोळ्यात किंवा तोंडात गेल्यास स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा, चूळ भरा.
तुम्हाला दमा किंवा त्वचेची कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास रंग खेळणे टाळा.