Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अमिताभ बच्चन यांचा चित्रीकरणादरम्यान अपघात
    ताज्या बातम्या

    अमिताभ बच्चन यांचा चित्रीकरणादरम्यान अपघात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 6, 2023Updated:March 6, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

    एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत असताना मी जखमी झालो आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली.”
    https://www.instagram.com/p/CpWliV3obzP/
    “आता मी माझ्या घरी परतलो आहे. जखमी जागेवर पट्टी बांधण्यात आली आहे. शिवाय औषधोपचारही सुरू आहेत. वेदनाही होत आहे. हालचाल करण्यासाठी तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. प्रकृती सुधारण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागेल. या गंभीर दुखापतीमुळे माझी इतर कामही सध्या बंद आहेत.”

     

    पुढे ते म्हणाले, “जोपर्यंत मी ठीक होत नाही तोपर्यंत माझं काम बंद राहील. सध्यातरी मी जलसामध्ये (मुंबईमधील अमिताभ यांचा बंगला) आराम करत आहे.”

    तसेच अधिक त्रास होऊ नये म्हणून अमिताभ पूर्णपणे आराम करणार आहेत. शिवाय चाहत्यांना भेटण्यासाठी ते जलसा बंगल्याबाहेरही या आठवड्यामध्ये येणार नाहीत. सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

    amitabhbachchan Bollywood
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif