तू सनी देओल सारखा दिसत आहे, अहमदनगरच्या माणसासोबत घडली मजेदार गोष्ट

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. आणि त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यात गदर हा त्याच्या सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्याची क्रेझ अजूनही आपल्याला चाहत्यांनामध्ये बघायला मिळत आहे. सनी देओल अमिषा पटेलसोबत (Amisha Patel) ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शुटिंगचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सनीने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मजेदार व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. तो एका माणसाला भेटला ज्याने सनीला ओळखलेच नाही आहे. हा व्हिडीओ सध्या जास्त व्हायरल होत आहे.

अहमदनगर (Ahmednagar) शहरात बैलगाडी चालवणाऱ्या एका माणसाला थांबवतात. व्हिडिओमध्ये कोणीतरी त्या व्यक्तीला विचारत आहे की तु कसा आहेस आणि तो बैलगाडीवर काय घेऊन जात आहेस. त्यावर माणसाने उत्तर दिले की तो जनावरांसाठी ज्वारीची भुसा घेवुन जात आहे. यानंतर सनी त्या व्हिडिओमध्ये येतो आणि त्या व्यक्तीशी हातमिळवणी करतो. त्यानंतर सनीने त्याला विचारले की तू कुठे जात आहेस आणि तो म्हणाला, ‘तू सनी देओलसारखा दिसतोस.’ यावर सनी हसतो आणि म्हणतो, ‘हो, मीच आहे.’ सनी देओलला भेटून त्या माणसाला आश्चर्यचा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, ‘अरे बाप रे. तुमचा आवाजपण सेम आहे’ सनी म्हणाला, ‘मी इथे आलोय, मला माझ्या गावाची आठवण आली.’ यावर तो म्हणाला, ‘आम्ही तुमचे व्हिडीओ आणि तुमचे वडील धर्मेंद्र यांचे व्हिडिओ ऑनलाइन पाहतो.’ गदर २ च्या शूटिंग दरम्यात त्यांना हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व काही वेळातच व्हायरल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.