लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वांनाच आपल्या भाषेचा अभिमान हा नक्कीच असतो, पण एखादी पाश्चिमात्य आपल्या मराठी मार्तृभाषेत बोलते. ते घेऊन आपले हृदय आनंदाने खुश होते. अनेक वर्षापासून आपण पाहत आलोय की काही बॉलीवूडकर मराठीत आपली झलक दाखवून गेलेयत तर काही मराठी कलाकारांनी हिंदी सिनेमातून आपल्या आभिनयाची चुणूक दाखवली आहे.साऊथचे सिनेमे हिंदीत आवर्जून डब करून मोठ्या प्रमाणात रिलीज केले जात आहेत. अनेक साऊथ स्टार्सनी बॉलीवूडचा रस्ता पकडला आहे. यात विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana),पूजा हेगडे (Pooja Hegde) अशी नावं घेता येतील. आता रश्मिकाचं नाव घेतलंच आहे तर तिच्या मराठीत पदार्पणाविषयी बातमी समोर आली आहे.
सोशल मीडियावर रश्मिकाचा एक प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ती चक्क मराठीत ‘नमस्कार मंडळी’ म्हणत लोकांना आपण मराठी लावणीवर ठुमके लगावताना दिसणार आहोत असं काहीसं सांगतांना दिसत आहे. तर रश्मिका मंदाना लवकरच आपल्याला यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात (Zee Chitra Gaurav Award)’ दिसणार आहे. तिनं स्वतः पोस्ट करत थोडं फार जमेल तसं मराठीत बोलत आपल्या चाहत्यांना याची बातमी दिली आहे. तर तिला लावणीवर नृत्य करतांना बघण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असणार आहे.