हिंदुत्व व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेला धर्म वेडा तरुण प्रकाश गोसावी

0

मुक्ताईनगर , , लोकशाही न्यूज नेटवर्क

आदिशक्ति संत मुक्ताई साहेबांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत टाळ, मृदुंगाच्या व नाम संकीर्तन गजराने अवघी मुक्ताईनगरी न्हाऊन निघत असते. त्यातच यात भर घातली आहे काही धर्म वेड्या तरुणांनी ज्यामुळे धर्म जागरूकता वाढीस लागलेली असून तरुणाई पुढे सरसावत असल्याने संत भूमीत धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लक्षणीय दिसून येत आहे.
यात सर्वात पुढे असणारा तरुण म्हणजे प्रकाश अशोक गोसावी हा तरुण ज्याने धर्म कार्यात स्वतःला वाहून घेतलेले असून त्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुक्ताईनगर शहरात प्रभू श्रीराम नवमी , हनुमान जयंती , शिवजयंती अशा उत्सवात सहकारी तरुणांना घेवून कार्यक्रम यशस्वी करण्याचा जीवापाड प्रयत्न करणे, तसेच गेल्या काही दिवसांपासून तरुणांनी व्यसनापासून लांब रहावे यासाठी प्रवर्तन चौकात सामूहिक हनुमान चालीसा पठण हा उपक्रम सुरू केला असून यातून तरुणांनी व्यसनांपासून लांब राहत , शरीर सदृढ ठेवण्यासाठी हनुमंताला साक्षी ठेवून बलोपासना करावी असा मौलिक संदेश यामध्यमातून देत आहे.

तसेच यंदाच्या महाशिवरात्री महोत्सव निमित्त अभूतपूर्व असा मिरवणूक व शिव पार्वती लग्न सोहळा पार पडला यात हजारो नागरिकांचा सहभाग तसेच नुकतेच बुऱ्हाणपूर येथील कथेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोफत प्रवास वाहने नियोजन याच प्रकाश गोसावी कडे दिले होते . हा कार्यक्रम ही यशस्वी झाला. त्यातच येत्या हनुमान जयंती मिरवणूक साठी भव्य अशी हनुमान मूर्ती संकल्पना असून यासाठी गेल्या ८ दिवसांपासून देणगी संकल्पना यशस्वी रित्या संपन्न झाली. त्यामुळे हा तरुण धार्मिक कार्यात पुढे येवू. कार्य करीत असल्याने राजकीय द्वेष होणार नाही असे होऊ शकते का ?

तर मग झालेच या तरुणाने कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी हॉटेल सुरू केलेली आहे. व यातूनच दोन पैसे तो धार्मिक कार्यात वापरत असतो. या ठिकाणी जेवणासाठी जाणारे हजारो लोक साक्षीदार असतील. येथे व्यतिरिक्त दुसरे काहीच मिळत नाही. परंतु राजकीय वृत्तीने पछाडलेल्या व ऐन केन प्रकारे मुलीचे राजकारणात पुनर्वसन करायचे या हेतूने बेभान झालेल्या एका बड्या नेत्याने चक्क या तरुणाचे हॉटेल चे नाव घेवून तो चरस , अफिम, गांजा असे अवैध धंदे करतो असे जाहीर मिडीयात येवून सांगायचे या प्रकार मात्र डोक्याला झिन झिण्या आणणारा ठरला असून एक सामाजिक व धार्मिक काम करणाऱ्या व्यक्तीला असे सुडाने जर कोणी नाहक बदनाम करत असेल तर भविष्यात धर्म कार्य करण्यास कोणी धजावणार नाही. घाणेरड्या राजकीय मनोवृत्तीने निदान या कडे तरी दुर्लक्ष करावे कारण तुम्हाला कुस्ती खेळण्यासाठी अनेक राजकीय मैदाने आहेत तेथे तुमचे कसब दाखवावे अशी चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.