६ ते ८ मार्च दरम्यान खान्देशात पावसाचा इशारा

0

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात अनेक ठिकाणी हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असून खान्देशात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी पिकांची काढणी सुरु असताना शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

६ मार्च ते ८ मार्च महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक, खानदेश, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.