Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
    जळगाव

    जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
    जळगाव नॅशनल सेफ्टी कौन्सीलच्या ‘हमारा लक्ष शून्य हानी’ या थीमच्या आधारे जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. दि.४ ते १० मार्च दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा केला जाईल. याची सुरवात आज सामूहिक सुरक्षेची शपथ घेऊन झाली.

    जैन इरिगेशनचे वरीष्ठ सहकारी सुनिल गुप्ता यांनी सर्व सहकाऱ्यांना दैनंदिन सुरक्षेसह औद्योगिक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. आपली दैनंदिन सुरक्षा करत असताना आपत्कालीन परिस्थीतीत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. यातून दूर्घटना कमी होऊन अपघात कसे कमी होतील, यावर लक्ष दिले पाहिजे. औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करताना सुरक्षेबाबत सजग राहिले पाहिजे. वर्षभर कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सुरक्षांविषयी उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे; जेणे करून अपघात कमी होतील. जैन इरिगेशन कंपनीचा प्रत्येक सहकारी हा वाहन चालवितांना हेल्मट वापरतो हेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे कंपनीतील प्रत्येक विभागात निबंध स्पर्धा, सुरक्षा पोस्टर चित्रकला आणि नाट्य रूपांतर हे कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेनंतर बक्षीस वितरण झाले. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, संजय पारख, वाय. जे. पाटील तसेच सुरक्षा विभागातील सुरक्षा अधिकारी स्वप्नील चौधरी, कैलास सैंदाणे, अमोल पाटील व सर्व अधिकारी यांनी या सप्ताहात सुरक्षासंबंधी जनजागृती केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि च्या कंपनीच्या जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, जैन प्लास्टिक पार्क आणि टाकरखेडा टिश्यूकल्चर पार्क येथे जैन ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ४ मार्च ते १० मार्च २०२३ या आठवड्यात विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरा करण्यात केला जाईल. यानिमित्त सुरक्षा व जनजागृती प्रयत्न केला जाईल. याप्रसंगी सहकाऱ्यांनी सुरक्षेची शपथ घेतली.

    #jain irrigasion
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif