अनेकांच्या सुखदुःखाचे स्टेटस ठेवणारा अवलिया धनराज चौधरी

0

धानोरा ता. चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क

आजच्या आधुनिक युगात या जगात कोणी कोणाचे नाही असं जरी आपण म्हणत असलो तरी याला अपवाद आहेत धानोरा येथील धनराज चौधरी ( मुखी महाराज ) महाराज गेल्या अनेक वर्षापासून गावासह परिसरातील एकच नव्हे तर बाहेर गावात देखील दुःखाची गोष्ट असो वा लग्न असो वा वाढदिवस असो
संबधीत व्यक्ती चा नंबर मिळवीत त्यांना शुभेच्छा त्यांना शुभेच्छा देत त्यांचे स्टेटस ठेवत असतात.

धानोरा येथील सतपंथ मंदिरात सेवक तसेच मुखी महाराज म्हणुन गेल्या २२ वर्षापासुन सेवा देणारे धनराज चौधरी हे मंदिरातील सेवा कार्य सांभाळुन वेळेत वेळ काढत गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन एक चांगला असा अभिनव उपक्रम ते राबवित आहेत. तो, म्हणजे गावातील असो परिसरातील अथवा बाहेरगावी असलेले लोक त्यांना वाढदिवसाच्या बॅनर बनवुन शुभेच्छा देणे, तसेच लग्नकार्याचे हळदी पासून ते लग्न लागेपर्यंत तसेच पंक्ती पासून सर्वच फोटो ते स्टेटसला ठेवत असतात त्याचप्रमाणे धानोरा परिसरात अथवा बाहेरगावी काही दुःखद घटना घडली असेल त्यांच्या दुःखाचे बॅनर देखील बनवून श्रद्धांजली अर्पण करत असतात कोणाची नियुक्ती अथवा पदोन्नती अथवा कोणी सेवेतून निवृत्त झाला असेल झाला असेल त्यांचे देखील बॅनर बनवून त्यांना शुभेच्छा आशीर्वाद देत स्टेटसला ठेवत असतात .

धानोरा परिसरात होणारे कीर्तन सप्ताह त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे विविध अंगी वेगळे फोटो ते स्टेटसला ठेवून एक चांगला असा अभिनव उपक्रम राबवित असल्यामुळे परिसरात त्यांचा नावलौकिक झालेला दिसून येतो आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांचा हा उपक्रम एक साखळी पद्धतीने सुरुवात झाला असून एक एक जण त्यांना दिवसागणी जुळत जात असून आज तागायत त्यांच्याकडे एकुण ४७०० मोबाईल नंबर आहेत तर दिवसभर २००० लोक त्यांचे स्टेटस बघतात एवढेच नव्हें तर धनराज मुखी धानोरा परिसरात हे स्टेटसकिंग म्हणुन देखील प्रसिध्दं झाले आहेत गावात अथवा परिसरात बाहेरगावी कुठे काही घटना घडली असेल किंवा कोणाचे वाढदिवस असतील कार्यक्रम झाले असतील धार्मिक विषय असतील तर कोणाला माहिती झालं नसेल तर अभिमानाने धनराज महाराजांचे टेटस कोणी बघत असतं आणि त्यांना लागलीच समजत असतं की आज गावात या ठिकाणी असा कार्यक्रम झाला.

आपण ज्या धाकाधुकीच्या जिवणात जगत आहोत, त्यात आपले नातेवाईक ( भावबंदकी ) या ना आपल्याला शुभेच्छा दयायला सुध्दां वेळ राहत नाही, जो तो आपल्या कामात व्यस्त रहातो सण, उत्सव निमित्त आपण एकत्र जमतो, ते काही क्षणापुरता मात्र धनराज महाराज
त्यांच्या संपर्कातल्या अथवा इतर कोणीही टेटस किंवा वाढदिवस शुभेच्छा ठेवल्या नसतील तर ते अभिमानाने त्यांना नंबर मागून संबंधित व्यक्तीपर्यंत वाढदिवसाचे बॅनर बनवून त्यांना पाठवतात व त्यांना शुभेच्छा देतात.

धानोरा परिसरातला साधं सोज्वळ असं व्यक्तिमत्व असलेले धनराज महाराज यांना एक मुलगा एक मुलगी मुलगी विवाहित असून जावई भारतीय सेवेत राजस्थान पोखरण येथे सेवा बजवीत आहेत तर मुलगा देखील विवाहित असून गावातील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सेल्समन या पदावर कार्यरत आहे त्यांच्या पत्नी या गृहिणी असून गावात कोणाशीही भांडण नसलेला परिवार म्हणून त्यांच्या घराकडे बघितले स्टेटस किंग धनराज महाराज यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिलीप महाजन यांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आजच्या धाकादुखीच्या जीवनात कोणाकडेच वेळ नाही आहे जो तो पैसा प्रपंच च्या मागे पडत असून त्यामुळे आपला वाढदिवस अथवा आपल्या घरी असलेलं शुभकार्य इतर लोकांना कळावं ते माहिती व्हावं त्याचप्रमाणे झालेली कोणती दुःखद घटना परिसरात समाजात लक्षात यावी , याकरिता गेल्या दोन वर्षापासून मी एक कार्य समाज रुपी कार्य म्हणता येईल हाती घेतले असून एक एक साखळी ,याप्रमाणे लोक माझ्याशी जुळत असून मला शुभेच्छा रुपी टेटस ठेवत असताना एक सतपंथ रुपी सेवा माझ्या हातून घडत असून त्याचा मला अभिमान वाटत असतो आपलाच धनराज महाराज अशा या स्टेटस किंग महाराजांचा नुकताच संत सावता माळी पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला !

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.