मनवेल ता. यावल : लोकशाही न्युज नेटवर्क
मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून ३ जागा बिनविरोध निवडुन आल्या आहेत.
२० मार्च पर्यत माघारी पर्यंत सर्वपक्षीयांच्या पुढाकाराने ही निवडणुक बिनविरोध व्हावी या करीता प्रयत्न आहे. माघारीची मुदत २० मार्च आहे.
मनवेल विकासोचे कार्यक्षेत्र थोरगव्हाण, पथराडे, दगडी व पिळोदा खुर्द असे आहे. यात सर्वसाधारण आठ जागा, महिला राखीव दोन इमाव एक, अनु. जाती/जमाती एक, वि.जा.भ.ज. व अनु.जाती/जमाती या एक विमाप्र एक अशा एकूण १३ जागा आहेत. या १३ जागांसाठी १८ उमदेवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
यात अनु जाती / जमाती या एक जागेतुन रायसिंग बंडु भालेराव ( थोरगव्हाण ) ,ओ.बी.सी.या प्रवर्गातून भरत धनसिंग चौधरी ( थोरगव्हाण ), वि.जा.भ.या प्रवर्गातून हरी तुकाराम धिवर असे तीन जागां बिनविरोध आल्या आहे.
उर्वरीत दहा जागा करीता १५ अर्ज शिल्लक असून बिनविरोध साठी प्रयत्न सुरु आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून के. व्ही. पाटील कामकाज पाहत तर संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे सहकार्य करीत आहेत.


