पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस , ‘होलिकोत्सव’ उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि होळीच्या आगमनाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कु.अनया पवार या विद्यार्थिनीने राष्ट्रीय सुरक्षा दिवस व त्याचे महत्व आपल्या प्रस्ताविकेतून स्पष्ट केले. कु.तनिष्का पाटील हिने आपल्या भाषणातून देशाच्या सुरक्षे सोबातच स्व- सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा, रस्ता सुरक्षा, विविध आजार व रोगांपासून सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा अशा अनेक गोष्टींकडे उपस्थीतांचे लक्ष वेधले. शिक्षण व सतर्कता यासाठी अति आवश्यक आहेत असे मत मांडले.

कु.श्रीनीका कोळेकर व कु. सार्थक पाटील या विद्यार्थ्यांनी रंगांचा उत्सव ‘होळी’ या सणाविषयी प्रास्ताविक मांडले.होलिकोत्सवाच्या प्रारंभी प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते श्री शारदा स्तवन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना होळी या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमा दरम्यान कु.कुंज अग्रवाल व कु. प्रांशूर सक्सेना या विद्यार्थ्यांनी होळी व रंगपंचमी या सणांचे महत्व आपल्या भाषणातून विषद केले. नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण केले जावे असा संदेश त्यांनी दिला. ई.३ री च्या विद्यार्थ्यांनी ‘ होलिका दहन ‘ या प्रसंगावर लघुनाटिका प्रस्तुत केली. विद्यार्थ्यांसाठी आयोजित मनोरंजन कार्यक्रमातून पारंपारिक नृत्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला व पर्यावरण संरक्षणावर आधारित घोषणा दिल्या.

शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी विद्यार्थी व पालकांना होलिकोत्सवाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.प्रदूषणविरहित आणि पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांचे त्यांनी केलेल्या सुंदर सादरीकरणासाठी कौतुक केले.शाळेचे उप-प्राचार्य श्री ग दीपक भावसार ,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ ,प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.