जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन तर्फे अहिंसा रन चे अनावरण

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगांव जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो लेडीज विंग तर्फे अहिंसा रन रविवार दि. २ एप्रिल २०२३ रोजी ३ / ५ /१० किलोमीटर अंतर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. अहिंसा रन ६५ शहरात एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार असून शांती व अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने आज दि. ३ मार्च २०२३ रोजी अहिंसा रन चे अनावरण करण्यात आले.

अहिंसा रन जळगांव जितो चे अनावरण हे जळगांवचे आयुक्त सौ. विद्या गायकवाड, पोलीस अधिक्षक एम जयकुमार, पोलीस उपाध्यक्ष संदीप गवित, माझी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अशोक जैन, व मुख्य प्रायोजक प्रीतम रायसोनी, रमेशदादा जैन, अजय ललवाणी, रजनीकांतभाई कोठारी, राजेश चोरडिया, डॉ. परेश दोशी, विराज कावडीया, इत्यादींच्या हस्ते करण्यात आले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गायझेशन जितो लेडीज विंग तर्फे आयोजित अहिंसा रन यात सर्वांनी सहभागी होऊन अहिंसेचा प्रसार करावा असे प्रास्तविक जितो लेडीज विंग अध्यक्ष सौ. निता जैन यांनी केले. जितो लेडीज विंग द्वारा आयोजित अहिंसा रन जळगांव अनावरण चे सूत्रसंचालन सौ. सुलेखा लुंकड यांनी केले व कार्यक्रमात जितो जळगांव चे अध्यक्ष प्रवीण पागरिया, सचिव प्रवीण छाजेड, जितो युथ विंग अध्यक्ष हरक सोनी, सचिव नीरज सेठिया, जळगांव रनर चे अध्यक्ष किरण बच्छावं, विक्रांत सराफ व कार्कर्त्यांसमवेत कुशल गांधी, अपना राका, गुंजन कांकरिया, विराज कावडीया, संध्या कांकरिया, उषा जैन, अनिमेश संचेती, चेतन जैन, प्रियांशू सुराणा ई. उपस्थित होते.

अहिंसा रन चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे व त्याच्यासाठी ऑनलाईन लिंक व क्यू आर कोड हे खाली दिले आहे आणि ऑफलाईन फॉर्म हे वसंत सुपर शॉप, नवजीवन सुपर शॉप, रायसोनी किड्स शॉपी व लपिनोज पिझ्झा ई. ठिकाणी उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.