महिला पोलीस अधिकारींना निरोप देतांना सहकारी भावूक…(व्हिडीओ)

0

 

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नाण्याला दोन बाजू असतात चीत किंवा पट, त्याच प्रमाणे माणसाच्याही दोन प्रवृत्ती असतात. एक मावळ आणि एक जहाल. आणि जर पोलीस म्हटलं की, अनेकांना त्यांचा कठोर रुद्रावतारच समोर येतो. मात्र, अहमदनगरमधून पोलिसांची हळवी बाजू समोर आली आहे.

त्यात झाल अस कि, अहमदनगरमधील एका महिला पोलीस निरीक्षकाची बदली झाल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना रडू आवरता आले नाही. त्यांनी भावनिक होत आपल्या अश्रूंना यावेळी वाट मोकळी करून दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांचा हा भावुक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी फुलांच्या वर्षवात आणि अश्रूंनी निरोप दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. कोरोना काळापासून बदल्या थांबवण्यात आल्या असल्याने अनेकांना बदल्यांची प्रतीक्षा होती. अहमदनगर शाहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांची बदली सुपा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.

मात्र, तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यापासून ज्योती गडकरी यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासह पोलीस कर्मचारी आणि नागरिकांचे प्रश्न अत्यंत शांततापूर्वक हाताळले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता.

नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून शांतता प्रस्थापित करण्यात महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना यश आले होते. बदली झाल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांच्या वर्षवात आणि अश्रूंनी सर्वांनी त्यांना निरोप दिला, यावेळी ज्योती गडकरी यांना सुद्धा रडू आवरले नाही. पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here