Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार
    जळगाव

    विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अधिवेशनातुन परतल्यावर रेल्वे स्थानकावरच घेतली आमदारांची भेट

    अमळनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर गाजत असताना अधिवेशनाचे पाहिले सेशन आटोपून अमळनेरात परतलेल्या आमदार पाटील यांचा मोठा सत्कार रेल्वे स्थानकावर करण्यात आला.
    मतदारसंघातील महाविकास आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच असंख्य शेतकरी बांधवानी सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन गाठून आमदार अनिल पाटील रेल्वे तुन उतरताच त्यांचा सत्कार केला.शेकडोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती पाहून आमदारही भारावले होते,सदर सत्काराला त्यांनी विरोध केला असता कुणीही एकूण न घेता त्यांच्या गळ्यात पुष्पहारांचा पाऊस पडला.शेतकरी बांधवानी तर याच पद्धतीने शेतकरी बांधवांच्या व्यथा शासन दरबारी मांडणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा असून आज संकटात असलो तरी कुठेतरी आपल्या सारख्या नेत्यांचा आम्हाला धीर असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.

    खरे भूमिपुत्र आमदार-प्रा सुभाष पाटील

    काँगेस किसान सभेचे अध्यक्ष प्रा सुभाष पाटील म्हणाले की आमचे खरे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांनी विधिमंडळात सरकारला जागे करून कापसाची दखल घ्यायला भाग पाडले,यामुळे आमच्या आमदारांचा अभिमान आम्हाला असून त्यांनी विधिमंडळात आंदोलन करीत जे कष्ट घेतले त्याबद्दल हा सत्कार आम्ही केला असून असेच शेतकऱ्यांचे विषय ते यापुढेही मांडत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    प्रत्येक अधिवेशनात अमळनेरचा आवाज-सचिन पाटील

    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी प्रत्येक अधिवेशनात आपले भूमीपूत्र आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने अमळनेर चा आवाज गरजत असून त्यांच्या विविध आंदोलनामुळे सरकारला त्यांची चांगलीच धडकी भरली असल्याची भावना व्यक्त केली.

    सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन-आ अनिल पाटील

    आमदार अनिल पाटील बोलताना म्हणाले की अधिवेशनात महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा होउन कापूस, कांदा व इतर धान खरेदी याकडे हे सरकार ठरवून लक्ष देत नसल्याने आम्ही सरकारला बोलते करण्याचा प्रयत्न केला,मी स्वतः आपल्याकडे कापसाची जी परिस्थिती झाली आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला,यामुळे सरकार मधील प्रतिनिधी बोलते झाले आता येणाऱ्या काळात कापूस, कांदा, सोयाबीन,धान व सिंचन क्षमता यावरच आम्ही बोलणार असून पाडळसरे धरणाला महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने चांगला निधी दिला त्याच पद्धतीने या सरकारने देखील द्यावा अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

    या प्रसंगी पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, विकासो चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकी संघ आदी सर्व आजी, माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    Amlner Anil Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif