मुक्ताईनगर मतदार संघातील रस्त्यांसाठी 17.57 कोटी रु. मंजूर – आ. चंद्रकांत पाटील

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय देण्याबाबत मान्यता मिळालेली असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभाग ,शासन निर्णय क्रमांकः मुग्रायो-२०२२/प्र.क्र.५८/बांधकाम-४ बांधकाम भवन, ५ वा मजला, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई ४०० ००१ तारीख: ३ मार्च, २०२३ रोजी जाहीर झालेल्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ च्या आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्य अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी त्याच्या नावासमोर दर्शविलेल्या किंमतीस नमुद केलेल्या अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता मिळालेली असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केलेल्या पाठपुराव्याने मतदार संघातील तीन रस्ते सुमारे २२.५७ कोटी रु. निधीसह मंजूर झालेले आहे.

या रस्त्यांना मिळाली मंजुरी

१) मुक्ताईनगर – पुरणाड ते शेमळदे रस्ता (MRL-०५, VR -३५, ODR २८ (लांबी ५.७१० कि.मी.) ( अंदाज पत्रकिय किंमत ४.७६.कोटी रु.)
२) रावेर – निंबोल ते रेंभोटे – वाघाडी – धामोडी – शिंगाडी – पुरी ते गोलवाडे रस्ता (TR- ०९, VR -९०,०७,९८ ) (लांबी ७.३६० किमी) (अंदाज पत्रकीय किंमत ५.७३ कोटी रु.)
३) बोदवड – रा.मा.४६ येवती – कुऱ्हा हरदो ते तालुका हद्द (शेवगे खुर्द) रस्ता . (TR-०४ , VR – ३७,७,२१, ODR – ३२) (लांबी – ८.६६० किमी) (अंदाज पत्रकीय ७ .०८ कोटी)

 

Leave A Reply

Your email address will not be published.