श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानचे पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील चांगदेव येथील श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानासह पर्यटनस्थळाचे भाग्य उजळले असून खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने पुरातत्त्व विभागाचे पथकाकडून प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी पूर्ण करण्यात येऊन डीपीआर तयार झाला आहे याबाबत केंद्र सरकारच्या पुरातव विभागाकडून शनिवारी श्री क्षेत्र चांगदेव देवस्थान व महानुभाव जागृत देवस्थानाची पाहणी करण्यात आली.
यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह पुरातत्त्व विभागाचे वरीष्ठ संवर्धन सहाय्यक दानवे, डॉ.शिवकुमार भगत, शशिकांत महाजन, श्रीकांत महाजन, राजेंद्र चौधरी, नांदू चौधरी, कैलास जावळे, गणेश चौधरी, जे.के.चौधरी, योगेश म्हसरे आदी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चांगदेव येथील मंदिर हेमाडपंती, एकाच दगडात कोरलेले असून, मंदिराच्या चोहोबाजूंनी दगडी मूर्ती कोरलेल्या आहेत. खासदार रक्षा खडसे यांनी चांगदेव पर्यटनस्थळाचा विकासाचा मुद्दा केंद्रीय मंत्रालय व पुरातत्व विभागाकडे लावून धरला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, देवस्थान जीर्णोधाराच्या कामास मंजुरी मिळालेली असून लवकरच परीसरात विकासकामे सुरू होणार आहे. येथेच असलेल्या महानुभाव पंथाच्या जागृत देवस्थान व शिव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रस्ताव बनविण्याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना खासदारांनी प्रसंगी सूचना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.