पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे “होलिकोत्सव” साजरा!

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. होलिकोत्सवाच्या प्रारंभी प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते शारदा स्तवन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी अनया पवार या विद्यार्थिनीने राष्ट्रीय सुरक्षा दिवस व त्याचे महत्व आपल्या प्रस्ताविकेतून स्पष्ट केले. तनिष्का पाटील हिने आपल्या भाषणातून देशाच्या सुरक्षे सोबातच स्व-सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा, रस्ता सुरक्षा, विविध आजार व रोगांपासून सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा अशा अनेक गोष्टींकडे उपस्थीतांचे लक्ष वेधले. नीका कोळेकर व सार्थक पाटील या विद्यार्थ्यांनी रंगांचा उत्सव ‘होळी’ या सणाविषयी प्रास्ताविक मांडले.

कार्यक्रमा दरम्यान कुंज अग्रवाल व प्रांशूर सक्सेना या विद्यार्थ्यांनी होळी व रंगपंचमी या सणांचे  महत्व आपल्या भाषणातून विषद केले. नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण केले जावे असा संदेश त्यांनी दिला. ई.३ री च्या विद्यार्थ्यांनी ‘होलिका दहन‘ या प्रसंगावर लघुनाटिका सादर केली. विद्यार्थ्यांसाठी आयोजित मनोरंजन कार्यक्रमातून पारंपारिक नृत्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला व पर्यावरण संरक्षणावर आधारित घोषणा दिल्या.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांचे त्यांनी केलेल्या सुंदर सादरीकरणासाठी कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थी व पालकांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. प्रदूषणविरहित आणि पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले.

यावेळी शाळेचे उप-प्राचार्य दीपक भावसार, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी  जितेंद्र कापडे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.