Browsing Category

गुन्हे वार्ता

शिरसोली येथे महिलेला दोन जणांनी काठीने बेदम झोडपले

जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथे शेतात झाडाच्या फांद्या का फेकल्याच्या कारणावरून एका महिलेला दोन जणांनी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली…

आव्हाने येथे अवैध वाळू डंपरवर कारवाई

जळगाव ;- तालुक्यातील आव्हाणे गावाजवळील मरीमाता मंदिराजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी डंपरचालक व मालक यांच्याविरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

घृणास्पद : आठ जणांचा महिलेवर सामूहिक अत्याचार ; बुलढाणा जिल्ह्यातील घटना

बुलढाणा :- . महिलेसोबत असलेल्या व्यक्तीकडे असलेली रक्कम हिसकावून घेत त्यांनी चाकूच्या धाकावर बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला . पीडित महिलेसोबत असलेल्या इसमाने…

कोळसा घोटाळा: विशेष न्यायालयाने विजय दर्डांना दोषी ठरवले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीच्या विशेष कोळसा न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेबाबत आपला निकाल दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. यामध्ये माजी राज्यसभा खासदार…

पाचोऱ्यात नवविवाहीतेची विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये तीन दिवसांपूर्वी राहण्यास आलेल्या १९ वर्षाच्या नवविहितेने घरामागे असलेल्या ५० फुट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास…

घर घेण्याची मागणी करत विवाहितेचा १५ लाखांसाठी छळ

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या विवाहितेला हुंड्यासाठी सासर मंडळीकडून घर घेण्यासाठी १५ लाख रूपयांची मागणी करत छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरूद्ध गुन्हा…

कोयता गँगचा पुन्हा कहर, पुणे पोलिसांच्या नाकात दम

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क कोयता गँगचा कहर पुण्यात थांबेल असं वाटत असतांनाच चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगचा कहर दिसून आला आहे. बारीक अंगकाठी असण्याऱ्या दोन तरुणांनी फक्त २०० रुपयांसाठी थेट कोयतंच काढला. हा धक्कादायक प्रकार…

मोहराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबणा; अज्ञातावर गुन्हा दाखल, गावात तणाव पुर्ण…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील मोहराळा येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गावातील बसस्टॅन्ड चौकात…

दारु पिऊन शिवीगाळ करणे पडले महागात, आठ वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात सहा आरोपींनी दोन वर्षांची शिक्षा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पिचर्डे येथे आठ वर्षापूर्वी दारूच्या नशेत असताना आरोपी नं १ याने फिर्यादीच्या पत्नीला व भावजाई यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली होती. या बाबत भडगांव पोलीस स्टेशन ला फिर्यादी -…

पाचोऱ्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद…

मोहराळा येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना गुन्हा दाखल

यावल लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील मोहराळा येथे महापुरूष यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोहराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा…

धुळ्यात धाडसी दरोडा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान १ कोटीचे दागिने लंपास…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळे शहरात आज आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आहे. मात्र अश्याही स्थितीत चोरट्यांनी आग्रारोडवरील…

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सासरच्या जाचाला कंटाळून गुरुवारी दि. ६ रोजी विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ममता शंकर भिल (वाय २०, रा. मन्यारखेडा) असे मृत विवाहितेची नाव आहे. मन्यारखेडा येथील ममता भिल यांचा विवाह शंकर भिल…

किरकोळ कारणावरून तरुणांसह महिलांना बेदम मारहाण-११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर शहरातील श्रीराम पेठ भागातील तरुणांना तसेच महिलांना किरकोळ कारणावरून जमावाने बेदम मारहाण करण्याची घटना दि. ९ वार रविवारी दुपारी तीन चार वाजता घडली आहे. त्यामुळे शहरातील वातावरण काही काळापुरते तंग झाले…

जळगावातून डॉक्टरांची कार चोरट्याने केली लंपास

जळगाव ;- एका डॉक्टरांची स्विप्ट कारची चोरी झाल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी पहाटे साडे तीनवाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन समोर उघडकीला आली आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Fraud : रेल्वेत नोकरीचे आमिष ; 20 लाखांचा गंडा

पाचोरा : - रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने युवकाची तब्बल 20 लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील रहिवाशी मोहन फकीरा चौधरी वय-५६ यांच्यासह एकाला त्यांच्या मुलांना रेल्वे विभागात नोकरीला लावून…

अरे देवा : हातगाडीतून टोमॅटो लुटले ! पोलिसांनी केली लुटणाऱ्याला अटक

प्रयागराज ;- टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी टोमॅटोचा वापर बंद केला आहे. महागाई आणि टोमॅटोचे वाढलेले भाव यामुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये टोमॅटो लुटल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी भाजी विक्रेत्या…

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव ;-बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात घडला होता. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना विद्यार्थींनीचा मृत्यू झाला .. याप्रकरणी शनिवार ८…

पाय घसरून पडल्याने गिरणेत बुडून वृद्धाचा मृत्यू ; आव्हाणे येथील घटना

जळगाव;- पाय घसरून पडल्याने ६५ वर्षीय वृध्दाचा गिरणा नदीतून जात असतांना बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे आज रविावरी ९ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली . . जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

पूंछमध्ये अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने २ जवान ठार

जम्मू: ;- जम्मू-काश्मीरमधील दुर्गम पूंछ भागात क्षेत्रीय वर्चस्व गस्तीदरम्यान नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरात भारतीय लष्करातील नायब सुभेदार कुलदीप सिंग वाहून गेले. जम्मूमधील संरक्षण विभागाच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमधील…

तांबापुरात घरफोडी 48 हजारांचा ऐवज लांबवला

जळगाव ;-शहरातील तांबापुरा परिसरात असणाऱ्या एका बंद घराच्या लोखंडी दरवाजाचे गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश करून हॉलमध्ये असणाऱ्या कपाटातील लॉकर तोडून यातून सुमारे 48 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस…

माहेरहून पंधरा लाख रुपये आण नाहीतर नांदवणार नाही ; जळगावच्या विवाहितेचा छळ

जळगाव मेहरून पंधरा लाख रुपये आणावे लागतील नाहीतर तुला नांदवणार नाही असे सांगून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव येथील वाघ नगरातील संस्कार…

जळगावात घरफोडी 26 हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव:- शहरातील शिवकालीन परिसरात घरातून सोन्याचे दागिन्यासह रोकड लंपास केल्याची घटना आठ जुलै रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिव कॉलनी येथे…

गटविकास अधिकार्‍याच्या छळाला कंटाळून ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याने 36 वर्षीय ग्रामसेविकेला वारंवार छळ करून शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी आज ग्रामसेविकेच्या…

भांडण सोडवण्यास गेलेल्या महिलेशी गैरवर्तन; तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

रावेर ;- तालुक्यातील एका गावात विवाहितेने पतीला मारहाण करीत असल्याने हे भांडण सोडविण्यास गेले असता तिघांनी महिलेच्या पतीला मारहाण करून भांडण सोडविणाऱ्या महिलेची गैरवर्तन केल्यामुळे तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

जळगाव ;- शहरातील गोलाणी मार्केट जवळील दत्त मंदिरासमोरून 20, 000 रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जैन मुनी कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह आढळला

बेळगाव ;- बेपत्ता असलेले बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील जैन मुनी आचार्य १०८ कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.…

यावल येथे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल

यावल-;- थोर पुरुषांचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्‍या मोहराळे येथील तरूणाविरुद्ध यावल पोलीस स्स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहराळे या गावात राहणारा नागेश्वर उर्फ नागो कैलास अडकमोल ( वय २० वर्ष ) या तरूणाने दिनांक ७ जुलै रोजी…

मंगळ ग्रह मंदिर येथे एकाचे पाकीट अज्ञात चोरट्यांनी लांबविले

अमळनेर:- मुंबई येथे मंत्रीपदाची शपथ घेऊन सात जुलै रोजी सकाळी जळगाव जिल्ह्यात परतलेले मंत्री अनिल भाईदास पाटील हे सायंकाळी मंगळ ग्रह मंदिरात आले असता गर्दीचा फायदा घेऊन एकाचे खिशातील पाकीट चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी…

दोन तरुणांनी दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेले

धरणगाव;- तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन मुलींना दोन तरुणांनी फुस लावून पळून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील…

चोपडा येथे धूम स्टाईलने शिक्षिकेची सोनसाखळी लांबवली

चोपडा :- शहरातील रामकुमार नगर भागात एका शिक्षकाची गळ्यातील 51 हजार रुपये किमतीची संस्थाकडे गाअज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरून येत असताना वारा केल्याची घटना सात जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला…

रवंजे बु. येथे बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू; हत्येने सर्वत्र खळबळ…

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क; अंगणवाडी जवळ मोटरसायकलचा कट लागल्यावरुन व माझ्या भावाला मारहाण का केली असा जाब विचारला असता तिघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. यावेळी झालेल्या बेदम मारहाणीमुळे नामदेव…

बालासोर घटनेप्रकरणी ३ रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात सीबीआयने शुक्रवारी ३ रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. तिघांनाही भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्य वधाचा गुन्हा) अन्वये अटक करण्यात आली…

लुधियानातील तीन वृद्ध व्यक्तींच्या हत्येने हादरले पंजाब !

लुधियाना – लुधियाना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या तीन ज्येष्ट नागरीकांची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. चमन लाल (75), त्यांची पत्नी (वय 70) आणि आई (वय 90) असे तीन जण यात मारले गेले आहेत. ही घटना आज सकाळी एका…

कोईम्बतूरचे आयपीएस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

चेन्नई ;- तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयपीएस अधिकारी विजय कुमार…

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगाव ;- तालुक्यातील मन्यारखेडा येथील एका २३ वर्षीय विवाहितेला मुलबाळ होत नसल्याने तिचा सासरच्या मंडळींकडून त्रास होऊ लागल्याने या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार ६ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आला असून…

जळगावात सुसाईड लिहून दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव : - रिजन ऑफ माय डेथ आय हेट माय लाईफ असे सुसाईट नोटमध्ये मागितली आई वडिलांची माफी वाक्य भिंतीवर लिहून ठेवत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या कृष्णप्रिया उर्फ साक्षी अरुण पाटील (वय १५, रा. शास्त्रीनगर ) या विद्यार्थीनीने गळफास घेवून आत्महत्या…

बुलढाणा बस अपघातातील चालकाच्या शरीरात आढळले 30 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल

बुलडाणा ;-बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण अपघातामागील कारण काय? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, तपासात एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात 30 टक्क्यांहून अधिक…

मतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती

पारोळा तालुक्यातील धक्कादायक प्रकार पारोळा :-तालुक्यातील एका गावात 26 वर्षीय मतिमंद मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकिस आला असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला…

दरोड्याच्या तयारीत असलेले चाळीसगावचे 5 आरोपी नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असलेल्या चाळीसगावच्या कुख्यात हैदर टोळीच्या पाच सदस्यांना भद्राकाली पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्या जवळून देशी बनावटीचा गावठी…

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोघांवर पथकाची कारवाई…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील नगरदेवळा व पुनगाव शिवारात दोन अवैध वाळू वाहतूक…

अंजनी धरण परीसरात अवैध उत्खनन करणारे ३ वाहने महसूल विभागाकडून जप्त..!

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथून थोड्या अंतरावर असलेल्या अंजनी धरण परीसरात मुरुमाचे अवैध उत्खनन करतांना महसूल प्रशासनाने दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी अशी तिन वाहने ३जुलै २०२३ रोजी रंगेहाथ पकडली. पंकज राजमल…

वाळू माफियांची मुजोरी… कारवाई दरम्यान तलाठ्याला लोटून देत ट्रॅक्टर ट्रॉलीसह पसार…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या पथकाने उमर्दे येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वीटभट्टी नजिक मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. कारवाई सुरु असताना…

पारोळ्यात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या २० जणांवर कारवाई…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक पारोळा शहरात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पारोळा शहरात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एकूण २० जणांना ताब्यात घेत…

अंजनविहिरे येथे शेतकऱ्याला विनाकारण मारहाण

धरणगाव ;- तालुक्यातील अंजनविहिरे गावात काही एक कारण नसताना दारूच्या नशेत एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत बैलगाडीचे शिंगाड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवार ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात…

वावडदा येथे म्हैस आल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला ५ जणांकडून मारहाण

जळगाव ;- शेताच्या बांधावर म्हैस आल्याच्या कारणावरून एका तरुण शेतकऱ्याला ५ जणांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वावडदा गावात असलेल्या गोपाळवाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा…

मुसळधार पावसामुळे दोन वाहून गेलेल्यांचे मृतदेह आढळले ; माजी उपनगराध्यक्ष बेपत्ता

रावेर;-बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यासह मध्यप्रदेशात झालेल्या जोरदार पाऊस झाल्याने नदी नळ्यांना मोठा पूर आल्याने या पुरात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली होती. यातील दोन जणांचे मृतदेह आज गुरुवारी सकाळी आढळले असून एका माजी…

धक्कादायक; चोरीचा खोटा आरोप लावला म्हणून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खोटा चोरीचा आरोप लावल्यामुळे भडगाव येथील एका तरुणाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती पाचोरा पोलीसांना कळताच…

मास्टर कॉलनीतून उभा असलेला ट्रक लांबवला

जळगाव ;- शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील एचपी पेट्रोल पंपाच्या जवळ लावलेला चार लाख 75 हजार रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

खळबळजनक; पत्नी व ३ मुलांची हत्या करून पतीने केली आत्महत्या…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. जौनपूरच्या मडियाहुन पोलीस स्टेशन हद्दीतील जयरामपूर गावामध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जौनपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच…

जळगावत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव ;- शहरात खोटे नगर स्टॉप जवळ अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली यासह १ ब्रास वाळू तालुका पोलिसांनी जप्त केली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, खोटे नगर स्टॉप जवळ ट्रॅक्टर…

कॉल करण्याच्या बहाण्याने एकाचा मोबाईल लांबविला

यावल ;-कॉल करण्याच्या बहाण्याने एकाने मोबाईल मागितल्याने तो त्याला दिल्यानंतर त्याने मोबाईल घेऊन हातावर तुरी देण्याचा प्रकार ३ जुलै रोजी सायंकाळी घडला . याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली…

सुमठाणे येथे घरफोडी ; १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरला !

पारोळा;- घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि २० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार तालुक्यातील सुमठाणे येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

एरंडोल येथे मोबाईलचे दुकान फोडले; 19 मोबाईल लांबविले

एरंडोल;- शहरातील शेतकी संघ कॉम्प्लेक्स मधील हरिओम एंटरप्राइजेस नावाच्या मोबाईलच्या दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे 19 मोबाईल आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत…

बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तीची एक लाखात फसवणूक

भुसावळ;- येथील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्या ला अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवून यात स्टेट बँकेच्या अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याचा मेसेज आल्याने त्यातील लिंक ओपन करून माहिती भरल्यानंतर खात्यातून एक लाख रुपये काढले गेल्याचा प्रकार उघडकीस आला असून…

भुसावळ येथे सिंधी समाज मुक्तिधाम मंदिरात चोरी

भुसावळ ;-शहरातील महेश नगर भागात असणाऱ्या सिंधी समाज मुक्तिधाम मंदिरात चोरट्यांनी डल्ला टाकला असून सुमारे पाच हजार आठशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना चार जुलै रोजी पहाटे उघडकीस आली .याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

तारखेडा येथे कंत्राटी वायरमनाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा ;- तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील २७ वर्ष वयाच्या कंत्राटी वायरमनने ४ जुलै मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घराच्या छताला दोर गळ्याला लावून आत्महत्या केली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

विवाहितेला विनाकारण मारहाण करून जिवेंठार मारण्याची धमकी

जळगाव ; विवाहितेला कारण नसतांना मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिंप्राळ्यातील माहेर असलेल्या विवाहितेसोबत घडला आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

बुलेट हवी म्हणून विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

धरणगाव ;- माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी विवाहितेकडे पैशांची अंगणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील माहेर असलेल्या भावना…

धरणगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

धरणगाव;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…

भुसावळात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ ;- तू मला खु आवडतेस असे सांगून एका तरुणाने ३० वर्षीय महिलेचा विनय भंग केल्याची घटना उघकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात ३० वर्षीय महिलाराहत असून मंगळवारी…

जळगावातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव ;- शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका केमीकल कंपनीच्या आवारातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली…

जामनेरात महिलेला मारली मिठी ; एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

जामनेर ;- घरात महिला एकटी असल्याचे पाहून एका २६ वर्षीय युवकाने घाट घुसून महिलेला चक्क मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका…

जंगलात गप्पा मारणाऱ्या प्रेमीयुगुलाला चौघांनी मारहाण करून लुटले !

मुक्ताईनगर ;- तालुक्यातील माळेगाव जंगल परिसरात मित्र मैत्रीण दोन्ही गप्पा मारत असताना चार अनोळखी इसमांनी येऊन दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाईल, सोन्याचे कानातील रिंग , आणि रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना उघड झाली असून…

तरुणाच्या पाठीवर सुरीने वार करून मोबाईल लांबविला

थोरगव्हाण सावदा दरम्यानची घटना ' दरोड्याचा गुन्हा दाखल सावदा ;- दुचाकीवरून सावद्याकडे जाणाऱ्या यारूनचया पाठीवर चाकूने हल्ला करून त्याच्या जवळील मोबाईल दुसर्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी मोटारसायकलवरून जाणार्‍या…

आ. किशोर पाटील यांचा अमोल शिंदेंना दे धक्का

विठ्ठलाच्या साक्षीने अनिल शिंदेंयांचेसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील गाळण मध्ये आमदार किशोर पाटील यांनी भाजपाच्या अमोल शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का दिला असून भारतीय जनता युवा मोर्च्यांचे तालुका उपाध्यक्ष तथा…

किरकोळ कारणावरून पती पत्नीला मारहाण

जळगाव ;- किरकोळ कारणावरून एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कंडारी शिवार घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल सतिष तायडे (वय-३०) रा. चिंचोली ता. यावल ह.मु. परेश रिसॉर्ट कंडारी…

जळगावच्या वाघनगरात घरफोडी ; ७५ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव ;-शहरासह जिल्ह्यात घरफोडी , चोरीच्या घटना घट असून जिल्ह्यात कुठेना कुठे हजारो लाखोंचा ऐवज लंपास होत आहे. . बंद घरातून चोरटयांनी ७५ हजारांचा ऐवज लांबविल्याची घट्नाउघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. वाघ नगर परिसरातील पायल तडवी…