जळगावत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

जळगाव ;- शहरात खोटे नगर स्टॉप जवळ अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली यासह १ ब्रास वाळू तालुका पोलिसांनी जप्त केली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, खोटे नगर स्टॉप जवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच १८ -७९३२ सह ट्रॉलीवर १ ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना चालक सचिन अशोक सपकाळे वय २४ रा. निमखेडी हा ४ जुलै रोजी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास आढळून आला . त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली आणि ३ हजार किमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात अली आहे. त्याच्या विरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कर्नाय्त आला असून तपस पोहेकॉ लीलाधर महाजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.