कॉल करण्याच्या बहाण्याने एकाचा मोबाईल लांबविला

0

यावल ;-कॉल करण्याच्या बहाण्याने एकाने मोबाईल मागितल्याने तो त्याला दिल्यानंतर त्याने मोबाईल घेऊन हातावर तुरी देण्याचा प्रकार ३ जुलै रोजी सायंकाळी घडला . याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, सतोत इंदिरानगर येथील रहिवाशी देवानंद नरेश लोहार वय १९ हे ३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जात असताना अज्ञात व्यक्तीने यावल येथील गणपती शोरूम जवळ कॉल करायचा आहे असे सांगून मोबाईल मागितला . मात्र मोबाईल दिल्यानन्तर काही वेळातच त्या भामट्याने देवानंद याचा ५ हजार किमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली . याबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.