मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

0

यावल : तालुक्यातील कठोरा येथील माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेला मुलबाळ होत नाही तसेच पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत म्हणून तिचा पतीसह सहा जणांनी छळ केला. तसेच तिला माहेरी सोडून दिले असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कठोरा येथील माहेर असलेल्या कोमल गणेश सपकाळे (वय २४) या विवाहितेने फैजपूर पोलिस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्या नुसार त्यांचा विवाह जळगावच्या जुन्या खेडी रोडवरील विठोबा नगरमधील गणेश विलास सपकाळे यांच्यासोबत ३ फेब्रुवारी २०१७ रोजी झाला होता.

विवाह झाल्यानंतर या विवाहितेला मूलबाळ होत नाही, तसेच पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, याकरिता पती गणेश सपकाळे, वंदना विलास सपकाळे, विलास त्र्यंबक सपकाळे, मोहन विलास सपकाळे, माधुरी विलास सपकाळे तसेच जळगावच्या रथ चौकातील कैलास त्र्यंबक सपकाळे या सहा जणांनी त्यांचा छळ केला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनात हवालदार उमेश चौधरी करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.