मोहराळा येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना गुन्हा दाखल

0

यावल लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील मोहराळा येथे महापुरूष यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोहराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला असून याच्या बाजूला दोन सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आलेले आहेत. काल रात्री कुणी तरी डबे फेकल्याने शॉर्ट सर्कीट होऊन लाईट गेलेली होती. काल सायंकाळी लाईट आली. काल दिवसभर पाऊस असल्याने कुणाचे पुतळ्याकडे लक्ष गेले नाही. दरम्यान, सायंकाळी अनिल केशव अडकमोल हे पुतळ्याजवळचे सीसीटिव्ही कॅमेरे सुरू आहे की नाही ? हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना कुणी तरी अज्ञात समाजकंटकाने पुतळ्याच्या दिशेने दोन दगड भिरकावल्याचे दिसून आले.

यामुळे पुतळ्याला दोन ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच समाजबांधवांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला.असून या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरताच यावल येथील पोलीस कर्मचारी मोहराळा येथे दाखल झाले. अजून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहराळा येथील समाजबांधवांनी यावल पोलीस स्थानकात धडक देऊन या प्रकरणा ची सखोल चोकशी करून कठोर कारवाईची मागणी केली. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला अनिल केशव अडकमोल ( वय ५२) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गावातील वातावरण नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डीवायएसपी कुणाल सोनवणे व पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर यांनी मोहराळा येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.