पाचोऱ्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद पवार यांनी सोमवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे. पिडीत महिला ही पाचोरा तालुक्यातील एका गावात राहते. महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेवून आरोपी आबा उर्फ शंकर देविदास भिल याने सन – २०१८ मध्ये नवरात्रीच्या काळात पिडीत महिलेला शेतात बोलावून तीन दिवस अत्याचार केला. तसेच ही घटना कुणाला सांगितली तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पिडीत महिला गर्भवती असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे एकुण १० साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीत महिलेचा न्यायालयात जबाब नोंदवितांना अनुवादक म्हणून शोभा पाटील यांनी सहकार्य केले व गुन्ह्यातील जबाब न्यायालयासमोर साक्ष दिली. शिवाय पिडीत महिला आणि तिचे बाळ आणि आरोपी यांचे डीएनए जुळून आला होता. या सर्व गोष्टी लक्षात घेता न्यायमुर्ती शरद पवार यांनी आरोपी आबा उर्फ शंकर देविदास भिल याला दोषी ठरवत ७ वर्ष सश्रम कारावास आणि २ हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तीवाद केला. तर पैरवी अधिकारी हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.