राष्ट्रहितासाठी सामाजिक भान आणि नेतृत्वगुण जोपासा : डॉ. राजीव प्रधान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘मी माझे काम चोख करेन. इतरांच्या कामाशी मला काही देणंघेणं नाही,’ अशी वृत्ती असून चालत नाही. अन्य सहकाऱ्यांबरोबर एकत्रितपणे काम करण्याची कला अवगत करून घ्यायला हवी. टीममध्ये राहून आपले वेगळेपण टिकविणे हेही एक कौशल्य आहे. सकारात्मक दृष्टी गरजेची आहे. सतत दोषदिग्दर्शन करणे योग्य नाही तसेच नेतृत्वाचे विविध अष्टपैलू गुण आत्मसात करा असे प्रतिपादन सोलापूर शहरातील सुपरिचित प्राध्यापक व तेथील रोटरी क्लबचे माजी डीस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रा. डॉ. राजीव प्रधान यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए प्रथम वर्षाच्या इंडक्शन कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे आयोजित “सोशल कॉन्सिअसनेस अॅन्ड लीडरशिप क्वालिटी” या विषयावर आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इंस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीचे प्रकाश पटेल हे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद की, या कार्यक्रमाचा उद्देश नवीन विद्यार्थ्यांना नवीन वातावरणात जुळवून घेण्यास मदत करणे, नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांमध्ये संस्थेची आणि महाविद्यालयाची नैतिकता आणि संस्कृती बिंबवणे, त्यांना इतर विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसोबत बंध निर्माण करण्यास मदत करणे आणि त्यांना आपल्या जीवनाच्या उद्देशाची जाणीव करून देणे हा आहे. त्याच बरोबर महाविद्यालयामधील उपलब्ध सर्व सोयीसुविधा जसे ग्रंथालय, महाविद्यालयात उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम, विद्यार्थी कल्याणाच्या योजना, धोरणे त्याचप्रमाणे खेळ, कला, साहित्य, संस्कृती, मुल्यशिक्षण याविषयीची सखोल माहीती दिली.

आपल्या व्यक्तिगत जीवनातच नाही तर सार्वजनिक जीवनातही जो यांच्या आधारे काम करेल त्याला नेतृत्वाच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लबचे मनीष पाटील, नीरज अग्रवाल निलेश जैन, निखील चौधरी, अशोक जैन व आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.