OMG २; ‘रख विश्वास, तू है शिव का दास”, असं म्हणत अक्षयची एन्ट्री

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) OMG २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो काही दिवसांपूर्वी अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला होता. OMG २ या चित्रपटामधील अक्षयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले असून, आता या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

OMG २ च्या टीझरची सुरुवात कांती शरण मुद्गुल यांच्या पत्रापासून होते. हे पात्र पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) साकारत आहे. टिझर मध्ये दाखवण्यात येते की कांती शरण मुद्गुल हे भगवान शंकराचे फार मोठे भक्त असतात. त्यानंतर टीझरमध्ये अक्षय कुमारची एन्ट्री होते. ‘रख विश्वास, तू है शिव का दास” हा अक्षय कुमारचा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतो. कांती शरण मुद्गुल यांच्या आयुष्यात काय घडते? हे OMG २ या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

OMG २ या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ११ ऑगस्टला OMG २ थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, आणि यामी गौतम (Yami Gautam) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.