छगन भुजबळ यांच्यासह अजून ‘एका’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राजकारणात एक वादळ येउन गेल्या सारखं झालं. नुकतेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात शाब्दिक वर हे सुरूच होते. तेवढयात अजून एक खळबळजनक फोन छगन भुजबळ यांना जातो. त्यात यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हे प्रकरण शांत होत नाही तोच छगन भुजबळ  यांच्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना देखील धमकीचा फोन आल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्या परळ निवासस्थानी हा धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली आहे.

यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला होता. यासंदर्भात ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. पुण्यात दौऱ्यावर असतांना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन असल्याचं सांगितलं जात आहे. भुजबळांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी रायगडामधील महाड येथून अटक केली आहे. धमकी देणाऱ्याचा नाव प्रशांत पाटील असून तो कोल्हापूरच्या चंडगड येथील आहे. या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत धमकी दिल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.