अबब; नेपाळमध्ये वेस्ट इंडिजच्या टीमला रिसिव्ह करण्यासाठी आली छोटा हत्ती गाडी; व्हिडिओ

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

प्रत्येक क्रिकेट बोर्ड बीसीसीआयएवढा श्रीमंत नाही किंवा इतर देशांमध्ये क्रिकेटचे तितके वर्चस्व नाही. नेपाळच्या संघाने नुकतेच क्रिकेट जगतात आपले पाय रोवले आहेत. नेपाळ क्रिकेट बोर्डही सुरुवातीच्या काळात आहे. नुकताच वेस्ट इंडिजचा राष्ट्रीय क्रिकेट संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी नेपाळला पोहोचला. त्यांचा पहिला सामना २७ एप्रिलला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक वेस्ट इंडिज संघ आणि नेपाळ क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवत आहेत.

नेपाळमध्ये वेस्ट इंडिज संघाची उडाली खिल्ली…

वेस्ट इंडिजचा संघ नेपाळ विमानतळावरून निघाला तेव्हा एक छोटा हत्ती आणि एक साधी बस या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी आली. व्हिडिओमध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू छोटा हत्तीमध्ये त्यांच्या किट बॅग ठेवताना दिसत आहेत. नेपाळने त्यांच्यासाठी केलेली व्यवस्था पाहून वेस्ट इंडिजचे काही खेळाडू चकित झाले. तसेच त्यांना एक साधी बस देण्यात आली ज्यामध्ये एसी नाही.

https://twitter.com/nibraz88cricket/status/1783205692394123618?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1783205692394123618%7Ctwgr%5E3aa9ec64a52221ca0e0131081501a6bf41c5322e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fviral%2Fnews%2Fnep-vs-wi-west-indies-a-team-players-reached-nepal-for-t20-series-and-load-their-luggage-by-himself-and-went-in-ordinary-bus-watch-viral-video-2024-04-25-1040744

Leave A Reply

Your email address will not be published.