भुसावळ येथे सिंधी समाज मुक्तिधाम मंदिरात चोरी

0

भुसावळ ;-शहरातील महेश नगर भागात असणाऱ्या सिंधी समाज मुक्तिधाम मंदिरात चोरट्यांनी डल्ला टाकला असून सुमारे पाच हजार आठशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना चार जुलै रोजी पहाटे उघडकीस आली .याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोरट्यांनी मंदिराचे स्टीलच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तीन हजार रुपये किमतीचा तांब्याचा नाग, पितळी त्रिशूल, डमरू आणि रोकड असा एकूण पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार चार रोजी उघडकीस आला. याप्रकरणी परेल दास कुकरेजा यांनी दिलेल्या खबरीवरून भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेअर कॉन्स्टेबल अन्वर शेख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.