जामनेरात महिलेला मारली मिठी ; एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

0

जामनेर ;- घरात महिला एकटी असल्याचे पाहून एका २६ वर्षीय युवकाने घाट घुसून महिलेला चक्क मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका गावात एक महिला राहत असून सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महिला ही घरी एकटी होती. या संधीचा फायदा घेत गावात राहणारा नराधम विष्णू दल्लू चव्हाण याने घरात घुसन तिच्या मुलाला महिलेकडे दिले.

त्यानंतर महिलने मुलाला जवळ घेत मागे फिरताच तिच्याशी अश्लिल चाळे करून तिला मिठी मारली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विष्णू दल्लू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रियाज शेख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.