गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

0

जळगाव ;- शहरातील गोलाणी मार्केट जवळील दत्त मंदिरासमोरून 20, 000 रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की खुशाल वासुदेव छाबडिया वय 39 हे मोबाईल व्यावसायिक असून त्यांची होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच १९ -०६९० ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी खुशाल छाबडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पूर्ण योगेश पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.