जळगावात घरफोडी 26 हजारांचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव:- शहरातील शिवकालीन परिसरात घरातून सोन्याचे दागिन्यासह रोकड लंपास केल्याची घटना आठ जुलै रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिव कॉलनी येथे सुनंदा गिरीश झोपे व 59 या वास्तव्याला असून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून आठ प्रवेश करून घरातील २१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोकड चोरून नेले.
ही घटना ७ जुलै च्या रात्री साडेदहा ते ८जुलै च्या सकाळी आठ वाजे पूर्वी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला सुनंदा झोपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार सुशील चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.