रवंजे बु. येथे बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू; हत्येने सर्वत्र खळबळ…

0

 

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क;

 

अंगणवाडी जवळ मोटरसायकलचा कट लागल्यावरुन व माझ्या भावाला मारहाण का केली असा जाब विचारला असता तिघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. यावेळी झालेल्या बेदम मारहाणीमुळे नामदेव अशोक कोळी उर्फ रावण (२५) हा युवक रवंजे बु.येथील बसस्थानक चौकात बेशुद्ध पडला. व त्याची बजाज पल्सर दुचाकी पेटवून देण्यात आली.

एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे व पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांना घटनेचे वृत्त समजताच त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नामदेव कोळी यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तपासणी अंती नामदेव कोळी याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. दोन्ही गटांतर्फे एरंडोल पोलिस स्टेशन ला परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेमुळे एरंडोल तालुका हादरला आहे.

सुभाष अशोक कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण माळी यांचा मुलगा चेतन माळी,आनंदा माळी हे हातात लोखंडी अँगल व लोखंडी पाइप घेवून माझ्या घरी आले असता माझा भाऊ नामदेव कोळी याच्या दुचाकीचा चेतन लक्ष्मण माळी यास अंगणवाडी जवळ कट लागल्याने दोघांमध्ये वादविवाद होऊन परस्पर शिवीगाळ करण्यात आली.

७जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नामदेव हा बस स्थानक चौकात जावून माझ्या मित्राला मारहाण का केली याबाबत आनंदा माळी व लक्ष्मण माळी यांना विचारणा केली असता त्या तिघांमध्ये वाद झाला. यावेळी नामदेव कोळी याने आनंदा माळी याचे पोटात व लक्ष्मण माळी याच्या हातावर चाकू मारून गावाबाहेर शेतात पलायन केले. त्याचा शोध घेऊन त्याला बसस्थानक चौकात त्यास बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याची दुचाकी ही पेटवून देण्यात आली.

लक्ष्मण गणपत माळी यांच्या फिर्यादीनुसार नामदेव उर्फ रावण अशोक कोळी याने माझ्या घरी दारू पिऊन आला व माझा मुलगा कुणाल यास रागावून व घरासमोर जोरजोरात शिवीगाळ करु लागला. ७जुलै २०२३ रोजी लक्ष्मण व त्याचा भाऊ सुनिल हे बस स्थानक चौकात गप्पा करीत असताना त्यावेळी नामदेव कोळी उर्फ रावण हा त्याच्या मित्रासोबत येवून त्याने माझा भाऊ सुनिल यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने त्याच्या पोटात वार केला. तसेच लक्ष्मण हा भांडण सोडवण्यास गेला असता त्याच्या डाव्या हातावर चाकू मारून दुखापत करण्यात आली. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, अनिल पाटील, मिलींद कुमावत, अकील मुजावर, दत्ता ठाकरे, राहूल पाचपोळ हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.