मंगळ ग्रह मंदिर येथे एकाचे पाकीट अज्ञात चोरट्यांनी लांबविले

0

अमळनेर:- मुंबई येथे मंत्रीपदाची शपथ घेऊन सात जुलै रोजी सकाळी जळगाव जिल्ह्यात परतलेले मंत्री अनिल भाईदास पाटील हे सायंकाळी मंगळ ग्रह मंदिरात आले असता गर्दीचा फायदा घेऊन एकाचे खिशातील पाकीट चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळ ग्रह मंदिर येथे नुकतेच मंत्री झालेले अनिल भाईदास पाटील यांचे मंगळ ग्रह मंदिर परिसरात सात जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अज्ञात भामट्याने मंत्री अनिल पाटील यांच्या खिशातील पाकीट चोरण्याच्या प्रयत्न केला असतांना फिर्यादी गोविंद विंचुरकर वय 52 यांनी त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला चिमटा घेऊन चोरटा पसार झाला. फ़िर्यादिचे जेडीसीसी बँकेचे एटीएम कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि 820 रुपये रोख असे आणि लेदर चे पाकीट असा मुद्देमाल होता. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला विंचुरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.