दखल लोकशाहीची, रस्त्याच्या डागडुजी ला सुरूवात

स्वच्छता गृहाची सुधारणा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा नगरपालिकेच्या वतीने दैनिक लोकशाही च्या वृत्ताची दखल घेत बाजारपेठेतील रस्त्यांची डागडुजीला सुरूवात करण्यात आली असून, याबाबत अधिक माहिती अशी की दि. २९ जुन रोजी दैनिक लोकशाही ने बाजारपेठेतील रस्त्यांचे भाग्य उजाडेल का? या मथळ्याखाली सचित्र बातमी प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल घेत नगरपरिषदेच्या वतीने बाजारपेठेत आज कचखडी टाकत डागडुजी ला सुरूवात केली, तसेच याच वृतात बाजारपेठेतील स्वच्छता गृहाची सुधारणा करण्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या मुख्यनागरी समस्या चे वृत दैनिक लोकशाहीने प्रकाशित केल्याने जनसामान्यमध्ये याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दैनिक लोकशाही च्या वृत्तानंतर नगरपरिषदेच्या वतीने दोन्ही नागरी समस्याची दखल घेण्यात आली याबद्दल नागरिकांनी दैनिक लोकशाहीचे आभार मानले.

पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू
शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काम सध्या प्रलंबित ठेवण्यात आले आहे पाणी पुरवठा पाईप लाईन चे काम पुर्ण झाल्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल असे पारोळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत पाटील यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना सांगितले.

स्वच्छता गृहाचे काम हाथी घेतले
बाजारपेठेतील स्वच्छता गृहाचे काम हाथी घेतले असून लवकरच हे स्वच्छतागृह नागरिकां साठी खुले करण्यात येईल अशी माहिती पारोळा नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक संघमित्रा संदानशिव यांनी माहिती देताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.