शतपावली करणाऱ्या क्षयरोग अधिकाऱ्याला अज्ञात कारने उडविले ; जळगावातील घटना

0

जळगाव;- मित्राला एका हॉटेलात भेटून आल्यानंतर रस्ता ओलांडताना अज्ञात भरधाव कारने क्षयरोग अधिकाऱ्याला जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हॉटेल रॉयल पॅलेस समोरील रस्त्यावर घडली असून याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध रामानंद नांगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद भाऊराव लांडे (वय-४३ रा. गोरवले रोड, पोर्तूगीज चर्चजवळ, मुंबई) असे मयत अधिकाऱ्याचे नाव आहे. हर्षद लांडे हे वडील, पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत मुंबई येथील पोर्तूगीज चर्चजवळ वास्तव्याला असून ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या नाशिक विभागाचे क्षयरोग अधिकारी म्हणून नोकरीला होते. बुधवार दि. ८ मे रोजी मध्यरात्री १ वाजता ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या मिटिंगसाठी आपल्या टिमसह जळगाव शहरातील एका खासगी हॉटेलात उतरले होते.  ८ मे रोजी दिवसभर त्यांनी मिटींगला हजेरी लावली. बैठक आटोपल्यानंतर त्यांनी जेवण केल्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ते हॉटेल रॉयल पॅलेस येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. भेटून परत जात असताना रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पहाटे घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.