पारोळ्यात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या २० जणांवर कारवाई…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक पारोळा शहरात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पारोळा शहरात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एकूण २० जणांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणण्यात आले. दरम्यान पकडलेल्यांची नावे – तीलीचंद कपूर येदानी (२५),कपूर हरी येदानी(५२), अतिश कपूर येदानी (२३),मधू गोविंद भूरानी(४४), विकास दादू भुरानी(२३), नितेश कपूर येदानी (१९), मिलिंद लटार पवार (४८), आकाश दादू भूरानि(३२),सागर मिलिंद पवार (१९), अमर मिलिंद पवार(२२), बादल दादू भुरानि(२०),देवलाल गणलाल चव्हाण , गेंदलाल उदल चव्हाण(४६) चेनगिर दौलतगिर चव्हाण(५२),सागर चेनगिर चव्हाण(२२),शेखर चेनगिर चव्हाण(२१),नरेश कचरू पवार(२९), मिलिंद कचरू पवार(३०), कचरू भैयाजी पवार, हरपोष देवरा सोळंकी (४२), सर्व राहणार जामगढ  ता. काटोल जिल्हा नागपूर येथील आहेत. मात्र ते सदर ठिकाणी का व कशासाठी आले त्याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली.

दरम्यान नमुद संशयास्पद भटकणाऱ्या इसमांचा कोणतेतरी दखलपात्र गुन्ह्याशी संबंध असावा अशी दाट शक्यता वाटल्याने नमूद सर्व इसमांची काटोल पो.स्टे कडून मागणे करीता सर्वांचे ब रोल पाठविले आहे, तसेच संशयास्पद मिळून आलेल्या वर कलम १०९ प्रमाणे सर्व २० जणांवर चॅप्टर केस करून पारोळा तहसिलदार डॉ उल्हास देवरे यांच्या समक्ष हजर केले आहे, नमुदची कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली PSI राजू जाधव,PSI गंभीर शिंदे,हे कॉ मराठे,पो कॉ किशोर भोई, पो कॉ आशिष गायकवाड, पो को अभिजित पाटील, पो कॉ राहुल पाटील, पो को हेमचंद्र साबे यांनी  कारवाई केली असून यापुढेही संशयास्पद स्थितीत भटकनाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर सक्त कारवाई करण्यात येईल. असे पारोळा पोलीस स्टेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.