पारोळा ;- पारोळा अमळनेर रस्त्याजवळील बायपास वर आयशर टेम्पोने धडक दिल्याने शहरातील अरूण रामभाऊ पाटील ५५ रा डि डि नगर पारोळा यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील अरूण रामभाऊ पाटील हे रात्री आपल्या लाल रंगाची ॲक्टीवा क्रं, एम एच १९,बी डब्ल्यु ६४१९ हिच्यावरून शेतातून आपल्या घरी जात असताना अमळनेर रस्त्याजवळिल बायपास वर आयशर टेम्पो क्रमांक एम एच १८ एए ८८०३ यांने मागुन जोरदार धडक दिल्याने अरूण पाटील हे रस्त्यावर पडल्याने आयशर गाडीचे चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने त्या त्यांचा मृत्यू झाला आयशर चालका विरूद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.