व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
ब्रिटन, उत्तर अमेरिका आणि युरोपात आकाश शुक्रवारी अचानक रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघाले. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. प्रखर सौर वादळामुळे आकाशात निळा-गुलाबी प्रकाश पसरला. हे विलोभनीय दृश्य आणि निसर्गसौंदर्य ज्यांनी कोणी पाहिलं त्यांनी लगेच आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. आकाशात दिसणारी ही दुर्मिळ दृश्ये थक्क करणारी होती. आकाश अचानक निळे-गुलाबी कसे झाले हे अनेकांना कदाचित माहीतही नसेल.
अमेरिका, युरोपचे आकाश निळे-गुलाबी झाले…
पृथ्वीने दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली सौर वादळ आणि सौर वादळ अनुभवले. शुक्रवारी, टास्मानियापासून ब्रिटनपर्यंत आकाश अचानक निळे-गुलाबी झाले. त्यामुळे रंगीबेरंगी प्रकाशाने आकाश व्यापले होते. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने सांगितले की, “असे क्षण फारच दुर्मिळ आहेत. गेल्या काही वर्षांत आलेल्या सर्वात जोरदार वादळामुळे ही घटना घडल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे चुंबकीय वादळ पृथ्वीवर आदळले. यासंदर्भात आधीच इशारा देण्यात आला होता. या वादळाबाबत यूएस स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने आधीच इशारा दिला होता.