सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सासरच्या जाचाला कंटाळून गुरुवारी दि. ६ रोजी विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ममता शंकर भिल (वाय २०, रा. मन्यारखेडा) असे मृत विवाहितेची नाव आहे. मन्यारखेडा येथील ममता भिल यांचा विवाह शंकर भिल यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर विवाहितेचा पतीसह सासरच्यांनी छळ सुरु केला. तिला मारहाण केली. वारंवार होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून गुरुवारी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांत विवाहितेचा पती शंकर सुरेश बागले, सासू रेखा सुरेश बागले, सासरे सुरेश रामदास बागले, नणंद सुरेख यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.